मुंबई: पर्सनल लोन घेताना लोकांना काही गोष्टींची काळजी जरूर घेतली पाहिजे. जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर तुमचे नुकसान होऊ शकते.
लोकांना आयुष्यात सर्वच कामांना पैसे लागतात. यासाठी लोक नोकरी करतात बिझनेस करतात. मात्र अनेकदा काही गोष्टींसाठी पैशांची गरज पडते. त्यासाठी कर्ज घ्यावे लागते. यासाठी देशात अनेक बँका आहेत.
जर कोणाला घर खरेदी करायचे असेल तर होम लोनची व्यवस्थाआहे. जर कार खरेदी करायची असेल तर कार लोनची व्यवस्था आहे.
जर कोणाला खूपच गरजेचे काम असेल तर पर्सनल लोन घेतले जाते. पर्सनल लोन घेताना लोकांनी काही गोष्टींची काळजी घेणे अतिशय गरजेचे असते.
जेव्हा पर्सनल लोन घेत असाल तेव्हा व्याजदर जरूर चेक करा. नाहीतर यामुळे नुकसान होऊ शकते.
यासोबतच आपला सिबिल स्कोर चेक करा. कारण जर तुमचा सिविल स्कोर चांगला नसेल तर तुम्हाला लोन मिळणार नाही. यामुळे ते आधीपासूनच चेक करा.
पर्सनल लोन कधीही ब्रोकरच्या मदतीने घेऊ नका. तर सरळ बँकेकडून घ्या. तसेच महिन्याच्या ईएमआयवरून याची माहिती आधीच घ्या.