Friday, October 31, 2025
Happy Diwali

या देशात जायला भारतीयांना सर्वाधिक आवडते, मजेशीर आहे कारण

या देशात जायला भारतीयांना सर्वाधिक आवडते, मजेशीर आहे कारण

मुंबई: अनेक भारतीयांना सुट्टीमध्ये परदेशी प्रवास करायला आवडतो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक परदेशात फिरायला जातात. आज आम्ही तुम्हाला अशा टॉप देशांबद्दल सांगणार आहोत जिथे भारतीयांना सर्वाधिक फिरायला आवडते. जाणून घ्या भारतीयांना सर्वात जास्त कोणत्या देशांमध्ये फिरायला आवडते.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयांचा परदेशात फिरायला जाण्याचा ट्रेंड वाढला आहे. भारताशिवाय भारतीय आता परदेशातील पर्यटनाला पसंती देत आहेत. खासकरून सणांच्या सुट्ट्यांमध्ये तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भारतीय परदेशात जाण्याचा प्लान बनवतात. दरम्यान भारतीय लोक बजेटबाबत चिंतीत असतात. यासमुळेच ते भारताच्या जवळपासच्या देशांमध्ये फिरण्याला पसंती देतात.

थायलंड हा देश भारतीय नागरिकांचा फिरण्यासाठीचा आवडता टॉप देश आहे. येथे ४० हजाराहून अधिक मंदिरे, समुद्र किनारे, थाय मसाज, शॉपिंग आणि आयलंड प्रसिद्ध आहेत. येथील प्रमुख शहरांमध्ये पट्टाया आणि बँकॉक प्रसिद्ध आहेत. बँकॉकची टूर १५-२० हजारांत होऊ शकते.

इंडोनेशिया फिरण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय लोक जातात. हा देश भारतीयांचा फेव्हरेट देश आहे. येथील समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत.तसेच या देशांत अनेक सुंदर मंदिरेही आहेत. बालीची नाईटलाईफ अतिशय रंगीबेरंगी असते. बालीसाठी तुम्हाला ७० हजार रूपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

सिंगापूर देश सुंदर इमारती, हॉटेल्स आणि कसिनोसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही चायनाटाऊनला फिरू शकता. सिंगापूर फ्लायर, बॉटनिक गार्डन्स, सेंटोसा आयलँड आणि ऑर्चर्ड रोड फिरू शकता.

मलेशिया असा देश आहे जिथे अनेक भारतीयांना फिरायला जायला आवडते. मलेशिया फिरण्यासाठी तुलनात्मक स्वस्त आहे. येथे तुम्ही २५ हजार रूपयांपर्यंत फिरू शकता. येथे रेनफॉरेस्ट, पेट्रोनस टॉवर, बीच आणि कुआलांलपूरची नाईट लाईफचा आनंद घेऊ शकता.

युनायटेड किंगडम आपल्या जुन्या इमारती, महाल आणि म्युझियमसाठी प्रसिद्ध आहे. युकेमध्ये एडिनबरा शहराची सुंदरता तुमच्या मनाला भुरळ घालू शकते. येथील जुनी शहरे आणि गावे अतिशय सुंदर आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >