मुंबई : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात (Rain Update) आला आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढणार आहे. ऑगस्टमध्ये पावसाची तीव्रता कमी झाली होती. पण सप्टेंबरच्या सुरुवातीस पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी नागरिकांची धावपळ सुरू असताना पावसामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
हवामानतज्ज्ञ होसाळीकर यांच्या मते, येत्या २४ तासांत मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाचा प्रभाव राहील. पावसाची तीव्रता ४ सप्टेंबरपासून कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गणेशभक्तांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.