Friday, January 16, 2026

Deepika Ranveer Maternity Shoot : दीपिका-रणवीरचं बोल्ड मॅटर्निटी शूट ; बेबी बंप फ्लॉन्ट करत दिल्या रोमँटिक पोज

Deepika Ranveer Maternity Shoot : दीपिका-रणवीरचं बोल्ड मॅटर्निटी शूट ; बेबी बंप फ्लॉन्ट करत दिल्या रोमँटिक पोज
मुंबई: बॉलीवूडची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) या महिन्यात लग्नानंतर पहिल्यांदाच आई होणार आहे. अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका यांच्या घरी आता लवकरच गोंडस बाळाचं स्वागत होणार आहे. दोघांच्या घरी बाळाचे आगमन होण्यापूर्वी त्यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोशूटमधून दीपिकाचा प्रेग्नन्सी ग्लो तिच्या चेहऱ्यावर उठून दिसतो आहे. दीपिका-रणवीरने काही ब्लॅक अँड व्हाइटमध्ये फोटोशूट केलं आहे त्यात दोघांनी अप्रतिम रोमॅंटिक पोज दिल्या आहेत.या सर्व फोटोशूटमध्ये दीपिकाने बोल्ड अंदाजात तिचं बेबी बंप फ्लाँट केलं आहे. अभिनेत्रीच्या लेटेस्ट फोटोंवर चाहत्यांचा आणि बॉलीवूडच्या इतर कलाकारांच्या कमेंट्सचा कमेंटचा अक्षरश: पाऊस पडला आहे. https://www.instagram.com/p/C_alfd-SSHN/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== दीपिका पदुकोण सध्या तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. सध्या दीपिका पादुकोण आठ महिन्यांची प्रेग्नंट असून अवघ्या काहीच दिवसात ती आई होणार आहे. या महिन्यात ती बाळाला जन्म देणार असून दोघांनी जोडीने केलेलं फुटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दीपवीरचा रोमँटिक अंदाज या सर्व फोटोशूटमध्ये पाहायला मिळतोय. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह त्यांच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.    
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >