मुंबई: गणपती बाप्पाचे आगमन फक्त काही दिवसांवर आले आहे. गणपती बाप्पााच्या आगमनाच्या आदल्या दिवशी हरतालिका व्रत केले जाते. यंदा हे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला ६ सप्टेंबरला आहे.
या दिवशी पुजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून २ मिनिटांपासून ते सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असणार आहे. या मुहूर्तामध्ये उपास केल्याने दोन पटीने फलप्राप्ती होते.
या दिवशी कुमारिकांनी व्रत केल्यास त्यांना मनजोगता वर प्राप्त होतो. भगवान शिव आणि माता पार्वती यांची पुजा-अर्चा केल्यास कुमारिका मुलींच्या लवकर विवाहाचे योग बनतात.
तर सुवासिनी महिलांनी हे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. हरतालिकेचे व्रत हे सगळ्यात कठी व्रत मानले जाते.