Friday, October 10, 2025

हरतालिका व्रताने मिळेल अखंड सौभाग्य, हे व्रत केल्याने मिळतात अनेक फायदे

हरतालिका व्रताने मिळेल अखंड सौभाग्य, हे व्रत केल्याने मिळतात अनेक फायदे
मुंबई: गणपती बाप्पाचे आगमन फक्त काही दिवसांवर आले आहे. गणपती बाप्पााच्या आगमनाच्या आदल्या दिवशी हरतालिका व्रत केले जाते. यंदा हे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला ६ सप्टेंबरला आहे. या दिवशी पुजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून २ मिनिटांपासून ते सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असणार आहे. या मुहूर्तामध्ये उपास केल्याने दोन पटीने फलप्राप्ती होते. या दिवशी कुमारिकांनी व्रत केल्यास त्यांना मनजोगता वर प्राप्त होतो. भगवान शिव आणि माता पार्वती यांची पुजा-अर्चा केल्यास कुमारिका मुलींच्या लवकर विवाहाचे योग बनतात. तर सुवासिनी महिलांनी हे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. हरतालिकेचे व्रत हे सगळ्यात कठी व्रत मानले जाते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा