डिजिटल प्रकल्पांसाठी २०,८१७ कोटींच्या गुंतवणुकीसह डिजिटल कृषी मिशनची स्थापना करणार
नवी दिल्ली : देशात कृषीविषयक धोरण राबवण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी (Agricultural Infrastructure) केंद्रीय मंत्रिमंडळाकडून सात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून कृषी संबंधित उपक्रमांना चालना देण्यासाठी एकूण १३ हजार ९६६ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. यामध्ये डिजिटल कृषी मोहिम, अन्न व पोषण सुरक्षा, पशुधन, फलोत्पादन, शिक्षण व्यवस्थापनाच्या विकासाला चालना देण्यासाठी निधीला मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दिली. दिल्लीत ते माध्यमांशी बोलत होते.
मंत्री वैष्णव म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वात आधी डिजिटल कृषी मोहिम असून याच धर्तीवर विकसित केले जाणार आहेत. शेतीसाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. डिजिटल प्रकल्पांसाठी एकूण २० हजार ८१७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डिजिटल कृषी मिशनची स्थापना करण्यात येणार असल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळातील महत्वपूर्ण निर्णय…
डिजिटल कृषी मोहिमेसाठी २,८१७ कोटी रुपयांची मंजुरी
अन्न, पोषण सुरक्षेसाठी ३,९७९ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी
कृषी शिक्षण, व्यवस्थापन योजनेसाठी २,२९१ कोटी रुपयांची मंजुरी
फलोत्पादन योजनेसाठी ८६० कोटी रुपये मंजूर
पशुधन आरोग्य व्यवस्थापन योजनेसाठी ७१,७०२ कोटी रुपये मंजूर
कृषी विज्ञान केंद्राच्या विकासासाठी १,२०२ कोटी रुपये मंजूर
नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन योजनेसाठी १,११५ कोटी रुपये मंजूर