Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीGaneshotsav : गणेशोत्सवासाठी विविध साहित्यांनी सजली बाजारपेठ

Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी विविध साहित्यांनी सजली बाजारपेठ

तळा : महाराष्ट्राच्या लाडक्या बाप्पाचे आगमन यंदा लवकरच असल्याने गणेशोत्सवात लागणाऱ्या विविध साहित्यांनी तळा बाजारपेठ सजली आहे. मुंबईकर पाच दिवस आधीच कोकणात पोहोचतात. बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु होते. या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या असून आता इथे खरेदीसाठी लोकांची गर्दी दिसून येत आहे.

गणेशोत्सवासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असल्याने रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरित झालेले मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी आपल्या गावी परतू लागले आहेत. चाकरमानी चार दिवस आधीच गावी येऊन गावातील घराची साफसफाई करून घरामध्ये गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य भरून ठेवतात.तळा हे तालुक्याचं ठिकाण असल्याने आजूबाजूला वसलेले खेड्यातील अनेक नागरिक खरेदीसाठी शहरात येत असतात.तसेच फळे, पालेभाज्या,व इतर जीवनावश्यक वस्तू माफक दरात मिळत असल्याने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

गणरायाच्या पूजेसाठी लागणारे धुप, कापुर, अगरबत्ती, गळ्यातील कंठीहार,सजावटीसाठी लागणारे कृत्रिम फुलांच्या माळा तसेच विविध साहित्यांनी तळा बाजारपेठ सजली आहे.यावर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान महिलांच्या खात्यात जमा झाल्याने बाजारात खरेदीसाठी महिला वर्गाची देखील लगबग पाहायला मिळत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -