मुंबई: श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी सिनेमा ‘स्त्री 2’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. १५ ऑगस्टला रिलीज झालेल्या या सिनेमाला १८ दिवस झाले आहेत. मात्र थिएटर्समध्ये याचा दबदबा कायम आहे. सिनेमाची दररोज कोट्यावधींची कमाई होत आहे. तसेच दररोज वेगवेगळे रेकॉर्ड बनत आहेत. आपल्या तिसऱ्या शनिवारच्या कलेक्शनसह ‘स्त्री 2’ने नवा रेकॉर्ड बनवला आहे.
‘स्त्री 2’च्या प्रॉडक्शन हाऊश मॅडॉक सिनेमांच्या मते १५ दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एकूण ४५३.६० कोटी रूपयांची कमाई केली. सॅकनिल्कच्या माहितीनुसार १६व्या दिवशी सिनेमाने ८.५ कोटी रूपये कमावले होते. तर आता १७व्या दिवशीचे आकडे समोर आले आहे. ‘स्त्री 2’ने तिसऱ्या शनिवारी १६ कोटी रूपयांची दमदार कमाई केली आहे.
५०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला सिनेमा
‘स्त्री 2’च्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास आतापर्यंत ४७८.१० कोटींचा बिझनेस केला आहे. यासोबतच हा सिनेमा ५०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करण्याच्या जवळपास पोहोचला आहे.
जगभरात दमदार कलेक्शन
अमर कौशिक यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘स्त्री 2’ या सिनेमाने जगभरातही खूप कमाई केली आहे. १५ दिवसांत या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींचा बिझनेस केला होता.