मुंबई: श्रीलंका दौऱा संपल्यानंतर भारतीय खेळाडूंना तब्बल ४३ दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. ब्रेकनंतर १९ सप्टेंबरपासून भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध आपल्या घरात दोन कसोटी सामने आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. बांगलादेशविरुद्ध घरगुती कसोटी मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाईल.
सेहवागचा हा रेकॉर्ड तोडणार रोहित
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नजरा असतील. तो दमदार कामगिरी करण्याच्या तयारीत आहे. रोहितकडे कसोटी मालिकेसाठी एक महारेकॉर्ड बनवण्याची संधी असेल. रोहितने जर या मालिकेत ७ षटकार ठोकले तर भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज ठरेल.
रोहित शर्माचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागला मागे टाकेल. त्याने भारतासाठी १०३ कसोटी सामने खेळताना ९० षटकार ठोकले होते. रोहित शर्माने आतापर्यंत ५९ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ८४ षटकार ठोकले आहेत. महेंद्रसिंग धोनी ७८ षटकारांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. तर सचिन तेंडुलकर चौथ्या आणि रवींद्र जडेजा पाचव्या स्थानावर आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय
वीरेंद्र सेहवाग – १७८ डावांत ९० षटकार
रोहित शर्मा- १०१ डावांत ८४ षटकार
एमएस धोनी – १४४ डावांत ७८ षटकार
सचिन तेंडुलकर – ३२९ डावांत ६९ षटकार
रवींद्र जडेजा – १०५ डावांत ६४ षटकार
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे. ३७ वर्षीय रोहितने तीनही फॉरमॅट मिळून एकूण ४८३ सामने खेळले आहेत. यात त्याने ६२० षटकार ठोकले आहेत. रोहित टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू आहे. रोहितने १५९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण २०५ षटकार ठोकले आहेत.