Wednesday, May 21, 2025

कोलाजसाप्ताहिक

काव्यरंग - ही गुलाबी हवा

काव्यरंग - ही गुलाबी हवा
ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा
हाय श्वासातही ऐकू ये मारवा

तार छेडी रोमरोमातुनी
गीत झंकारले आज माझी मनी
सांज वाऱ्यातही गंध दाटे नवा
ऐकू ये मारवा...

का रंग हे उधळले अंबरी
भान हरपून मी कावरीबावरी
का कळेना तरी बोलतो पारवा
ऐकू ये मारवा...

गीत - गुरु ठाकुर
गायिका - वैशाली सामंत


मेंदीच्या पानावर


मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं
जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सले गं

झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गं
हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा गं

अजून तुझे हळदीचे अंग पिवळे गं
अजून तुझ्या डोळयांतील हलपण कवळे गं

गीत : सुरेश भट, गायक : लता मंगेशकर,
गायिका : लता मंगेशकर

Comments
Add Comment