Mumbai News : भांडूप स्टेशनला अनेक समस्यांचा वेढा ; प्रवासी त्रस्त!

  135

स्वयंचलित जिने बसवण्याची मागणी; स्टेशन परिसरातही अस्वच्छता


वैष्णवी भोगले


मुंबईची जीवनदायिनी असलेली मुंबई उपनगरीय लोकल सेवा देशाला सर्वाधिक कर प्राप्त करून देते. मुंबईच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे कमी खर्चात, कमी वेळेत ने आण करण्याचे काम लोकल करत असतात. त्यामुळे मुंबईतले अधिक प्रवासी लोकलने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. आणि महत्वाची बाब म्हणजे मुंबईकरांना देखील हाच प्रवास सोईस्कर आणि अंगवळणी पडला आहे. सद्या असे लक्षात येते की, मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे लोकल सेवेचा श्वास गुदमरत चालला आहे. कारण लोकल ट्रेनला मुसळधार पावसाचा तडाखा, ओव्हरहेड वायर तुटने, रुळावरून डब्बे घसरणे, रुळाला तडे जाणे, सिग्नल यंत्रणा बिघडणे , सूचना दर्शक फलक यामुळे प्रवाशांना होणारा त्रास वाढतच चालला आहे.


मी रोजच भाडूप ते बांद्रा असा प्रवास करते, माझा अनुभव सांगायचा तर, भांडुप हे मुंबईचे उपनगर आहे. भांडुप हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. भांडूपला कोकणी माणसे राहत असल्याने कोकणी माणसाची वस्ती मानली जाते. भांडूप स्टेशन विविध समस्यांनी ग्रासलेले आहे. भांडुप स्टेशनवर सायंकाळी बसलेल्या फेरीवाल्यांची स्टेशनच्या बाहेर, स्टेशनवरती वर्दळीमुळे अनेकदा प्लॅटफॉर्म, ट्रेनमध्ये गर्दी असल्याने प्रवाशांचा चढताना, उतरताना गोंधळ उडतो. त्यामुळे चेंगराचेंगरीत अपघात होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे फेरीवाल्यांची वर्दळ कमी करण्यात यावी. महत्वाची बाब म्हणजे या स्टेशनवर अनेकदा सूचनादर्शक फलक लावले दिसत जात नाहीत.


त्यामुळे अनेक प्रवाशांची, नोकरदारांची तारांबळ उडते. त्यात वयस्कर, अपंग माणसे असले तर त्यांना अशा समस्यांना सामोरे जावे लागते. काहीवेळा गेलेल्या गाड्यांचे फलक हे उशिरा दाखविले जातात. उदा. द्यायचे झाले तर २:१ ची कुर्ला स्टेशनला थांबा असलेल्या ट्रेनचा फलक काही वेळा ट्रेन गेल्यावर देखीलतसाच असतो. त्यामुळे मागच्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशांची गर्दी होते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांपर्यंत ट्रेनची माहिती वेळेत पोहोचविणे आवश्यक आहे. तसेच पावसाळ्यात भांडूप रेल्वे प्लॅटफॉर्मवरती पाण्याची गळती होत असते. प्लॅटफॉर्म क्र. १ वर पावसाचे पाणी तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा वेळेत करण्यात यावा. त्यामुळे प्रवासी भिजणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.


भांडूप स्टेशनच्या बाहेर दुकानदार दिवसभराचा भाजीपाल्याचा कचरा सार्वजनिक मुतारीजवळ टाकत असल्यामुळे त्या परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे काही प्रवासी स्टेशनच्या सार्वजनिक शोचालयांचा वापर करत असतात. स्टेशनवर असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचे देखील काहींचे दरवाजे नाहीत, पान, गुटखा खाऊन थुंकणे, कचरा टाकणे यामुळे तिथेही ट्रेनमधून ये-जा करताना येणाऱ्या दुर्गंधीमुळे प्रवासी वैतागले आहेत. भांडूप रेल्वे स्थानक परिसरातील पोलीस चौकीच्या बाजूला ६०६ बसचा थांबा देण्यात आला आहे. तिथे घरी जाण्यासाठी प्रवासी रांग लावतात.


त्या फुटपाथवर गटाराचे झाकण कधी बंद तर कधी उघडे असते. याची अजूनही दखल घेण्यात आलेली नाही. पोलीस चौकीच्या आजूबाजूला खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने अनेकवेळा गाड्यांमुळे खड्यांमध्ये साचलेले पाणी प्रवाशांच्या कपड्यांवर पडते, त्या पाण्यातून चालताना नागरिकांना खूपच कसरत करावी लागते. त्यामुळे पाऊस पडण्याच्या अगोदर खड्डे बुजविण्यात यावेत. भांडूप स्टेशनच्या बाहेर असलेल्या फ्लायओव्हरचा कमीतकमी वापर केला जातो. त्यामुळे फ्लायओव्हरची जागा गर्दुले आपल्याला राहण्यासाठी करतात. तसेच भांडूप स्टेशन परिसरातील सरकत्या जिन्याच्या बाजूला घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भांडूप पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील ब्रिजवर काळोखाचे साम्राज्य पसरलेले असते. त्याठिकाणाहून भांडूप नागरिकांची ये- जा असते त्यामुळे त्या ठिकाणी दिव्यांची सोय करणे गरजेचे आहे.



प्रवासी वर्गाची कळकळीची विनंती


भांडूप प्लॅटफॉर्म क्र. २ वर स्वयंचलित जिना बसविणे आवश्यक आहेत. भांडूप ईश्र्वरनगर गेटला तिकीट खिडकी करणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाने लोकल सेवा सुखकर करण्यासाठी वातानुकुलित गाड्यांची सोय केली होती, परंतु वातानुकुलीत गाड्यांमुळे बाकीच्या गाड्यांचा खोळंबा होत असतो. तसेच वातानुकुलीत गाड्या रात्रीच्या रिकाम्याच जात असल्याने वातानुकुलीत गाड्यांची वेळ रात्री उशिरापर्यंत न ठेवता रात्री १० वाजेपर्यंत ठेवण्यात यावी. महिला वर्गाचे दोन डब्बे वाढवून देखील रोजगारासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे महिलांचे डब्बे वाढविण्यात यावेत. अनेकवेळा मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉकच्या वेळी किंवा नोकरदारांच्या कामाच्या वेळात (सकाळी, संध्याकाळी) भांडूप स्टेशनला फास्ट लोकल वाढविण्यात येऊन थांबा देणे भांडूपवासियांसाठी लाभदायक ठरेल.

Comments
Add Comment

Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व

Dada Bhuse : खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’

Devendra Fadanvis : पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; SDRF आणि NDRF यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री

नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात

Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad : आमदार गायकवाड बनियान-टॉवेलवर येतो अन् कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याची धुलाई; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारवाई...

मुंबई : नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तवणूक आमदार

'जेएनपीटी आणि वाढवन बंदर प्राधिकरणांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता' – मंत्री नितेश राणे

* परदेशी पतसंस्था १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार * बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण

अभिनेत्री आलिया भटला असिस्टंटने लावला ७७ लाखांचा चूना

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटची माजी पर्सनल असिस्टंट वेदिका प्रकाश