मुंबई: सकाळी पाणी पिणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. मात्र हे जाणणे गरजेचे आहे की थंड की गरम पाणी पिणे चांगले असते. सकाळच्या वेळेस गरम पाणी प्यायल्याने पाचनतंत्र सुरळीत राहते.
पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय गरजेचे आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. अनेक आजारांपासूनही बचाव होतो. यासाठी सर्वांना नियमितपणे २ ते ३ लीटर पाणी प्यायले पाहिजे.
आयुर्वेदानुसार पाणी पिऊन सकाळची सुरूवात केल्याने अनेक आजार दूर होतात. याच कारणामुळे अनेकजण सकाळी उठल्यावर पाणी पिणे पसंत करतात. यातील काही लोक गरम पाणी पितात तर काही जण थंड.
गरम पाणी पाचनतंत्र अॅक्टिव्ह राहते आणि आतड्यांमधील घाणे बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्ममध्येही वाढ होते. गरम पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले फॅट वेगाने बर्न होते. सकाळी गरम पाणी प्यायल्याने वजन वेगाने घटण्यास मदत होते.
आरोग्य तज्ञांनुसार सकाळी-सकाळी गरम पाणी प्यायले पाहिजे. कारण थंड पाण्यामुळे नुकसान होते. थंड पाण्यामुळे पाचनतंत्र संकुचित करून अनेक समस्या निर्माण करू शकतात. यामुळे अपचन, गॅस आणि अॅसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो.