मुंबई : मुंबईत सध्या मविआचे (Mahavikas Aaghadi) जोडे मारो आंदोलन सुरु आहे. मात्र महाभकास आघाडीच्या या आंदोलनाला भाजपाच्या (BJP) आंदोलनाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूरचे शाहीर शुभम विभूते यांनी आज दादर येथील कैलास लस्सी समोर पोवाडे सादर केले. तसेच मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार तसेच जिल्हा प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी मार्गदर्शन केले.
आमदार कालिदास कोळंबकर, आमदार तमिल सेल्वन हे यावेळी उपस्थित होते. यावेळी जय भवानी जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.