Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीKedarnath Helicopter Crash : भीषण अपघात! केदारनाथमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर हजारो फुटांवरुन थेट...

Kedarnath Helicopter Crash : भीषण अपघात! केदारनाथमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर हजारो फुटांवरुन थेट क्रॅश

एअरलिफ्ट करताना चेन तुटली, अन्… ; अपघाताचा थरार व्हिडिओ समोर

केदारनाथ : उत्तराखंडच्या केदारनाथ धाममधून आज सकाळी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी केदारनाथमध्ये उतरताना हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असताना आज पुन्हा अशीच घटना घडली आहे. भारतीय वायुसेनेचे एमआय – १७ या हेलिकॉप्टरची टोईग चेन तुटल्याने डोंगरात कोसळले. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून अद्याप कोणतीही हानी झाल्याची माहिती समोर आली नाही. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. परंतु केदारनाथमध्ते सततच्या होणाऱ्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथमध्ये आठवड्यापूर्वी भारतीय वायुसेनेच्या एमआय – १७ हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे तात्काळ लँडिंग करण्यात आली होती. या हेलिकॉप्टरची दुरुस्ती करण्यासाठी लष्कराने दुसरे हेलिकॉप्टर आणले होते. बिघाड असलेल्या हेलिकॉप्टरला घेऊन सदरील हेलिकॉप्टरने आकाशात उड्डाण भरले. मात्र, त्याचवेळी हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पायलटने पुन्हा लँडिंगचा निर्णय घेतला. परंतु, लँडिंग करण्याआधीच हेलिकॉप्टरची टोईग चेन तुटली. त्यामुळे दुसरे हेलिकॉप्टर आकाशात गरागरा फिरले आणि डोंगराळ भागात जाऊन कोसळले.

दरम्यान, या अपघाताचा संपूर्ण व्हिडीओ समोर आला आहे. तसेच या अपघातात कोणी जखमी झाले आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -