आमदार नितेश राणे यांनी प्रशासनासह मुस्लिम समाजाला दिला इशारा
रत्नागिरी : सध्या रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) लांगूलचालनाचे विषय सुरु आहेत. रत्नागिरीमध्ये किल्ल्यांवर मुस्लिम संघटनेतर्फे (Muslim Association) अनधिकृत बांधकाम सुरु असून त्याला मदारचे स्वरुप दिले जात आहे. सातत्याने सुरु असलेल्या या विकृत बांधकामांबाबत शासनाच्या (Government) माध्यमातून पत्र लिहली जात आहेत. २०१६ सालीच अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय लागू केला आहे. मात्र तरीही मुस्लिम समाजाकडून अतिक्रमण केले जात असल्यामुळे भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रत्नागिरी प्रशासनाला रोखठोक सवाल विचारला आहे.
रत्नागिरीतील प्रशासनाला रत्नागिरीमध्ये हिंदू देखील राहतात याचा विसर पडला आहे. रत्नागिरी शहरामध्ये कुठल्याही हिंदूने शासकीय जमिनीवर छोटी चहाची टपरी बांधली तरीही ती काढण्यासाठी तातडीने पोलीस फोर्स मागवले जातात. परंतु रत्नागिरीतील किल्ल्यांवर मुस्लिम समाजाकडून मदारी उभारण्याचे काम सुरु असताना देखील शासन कोणतीही दखल घेत नाही. त्यामुळे रत्नागिरीमधील प्रशासनाने जो नियम हिंदू समाजाला लागतो तोच नियम मुस्लिम समाजाला देखील लागू केला पाहिजे असे स्पष्ट मत नितेश राणे यांनी मांडले. आजपर्यंत रत्नागिरीमध्ये शरिया कायदा लागू झालेला आहे का? त्याचबरोबर मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीमध्ये मदार या विषयाला परवानगी आहे का? मग अनधिकृत बांधकामांना काढण्यामध्ये काय अडचण आहे, असा सवाल रत्नागिरी प्रशासनासह मुस्लिम समाजाला विचारला.
…तर रत्नागिरीतील हिंदू समाज आक्रमक होणार
रत्नागिरीतील अनधिकृत बांधकामाबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, एसपी आणि त्यांच्या प्रतिनिधींसोबत नितेश राणे आणि हिंदू संघटनेसोबत चर्चा केली. मात्र प्रशासनाने दिलेली कारणे आणि त्याबाबतचा आवाज उठवून रत्नागिरी हिंदू संघटनेचा संयम संपला आहे. त्यामुळे प्रशासनाने आता काम रोखण्यासाठी तारखा द्याव्या. तसेच तारखांच्या अनुसार जो-तो स्ट्रकचर निघाला नाही तर रत्नागिरीमधील हिंदू संघटना आक्रमक होईल. त्यानंतर रत्नागिरीमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी आणि नगरसेविका प्रतिनिधी यांच्याकडे राहिल. कारण त्यांनी अॅक्शन न घेतल्यामुळे तो दिवस उजाडेल.
त्याचबरोबर हिंदू आणि मुस्लिम यांच्यात प्रशासनाकडून केला जाणारा फरक थांबला पाहिजे, अन्यथा रत्नागिरीमधील हिंदू समाज आपला तिसरा डोळा उघडून तांडव करेल, आणि मग निर्माण होणारी परिस्थिती कोणाच्याही हातात राहणार नाही, असा गंभीर इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.