
गणपती आगमन मिरवणुकांमुळे तसंच चिंतामणी आगमन मिरवणुकीमुळे लालबाग, परळ भागामध्ये शनिवारी आणि रविवारी गर्दी होण्याची शक्यता अफाट असल्याने प्रवाशांनी लालबाग, परळ (डॉ. बी.ए. आंबेडकर रोडने) जाणं टाळावे. तर बॅ. नाथ पै, रफी किडवाई रोड, ना. म. जोशी, साने गुरुजी मार्गाचा वापर करावा, असं मुंबई वाहूतक पोलिसांनी मुंबईकरांना आवाहन केलंय.
चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन मिरवणूक सोहळा ३१ ऑगस्ट २०२४ ला दुपारी २.०० वाजता सुरू होणार आहे. यानिमित्ताने गणेश टॉकीज, (परब चौक) साने गुरुजी मार्गे-गॅस कंपनी जंक्शन- डॉ. बी. ए. रोड- दक्षिण वाहिनी सरदार हॉटेल जंक्शन दत्ताराम लाड मार्ग ते चिंचपोकळीतील मंडळाच्या मंडपापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार असल्याने वाहतूक पोलिसांनी रस्ते वाहतुकीत बदल केलाय.
मुंबईतील वाहतुकीसाठी हे मार्ग बंद राहणार!
- डॉ. बी. ए. रोड, उत्तर वाहिनी हंसराज राठोड चौक (बावला कंपाऊंड जंक्शन) ते कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
- डॉ. बी. ए. रोड, दक्षिण वाहिनी कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) ते हंसराज राठोड चौक (बावला कंपाऊंड जंक्शन).
- साने गुरुजी मार्ग कॉम्रेड गणाचार्य जंक्शन (चिंचपोकळी जंक्शन) ते संत जगनाडे महाराज चौकापर्यंत (गॅस कंपनी).
- ना. म. जोशी मार्ग - गुलाबराव गणाचार्य चौक (चिंचपोकळी जंक्शन) ते गंगाराम तळेकर चौक (एस. ब्रिज. जंक्शन).
- महादेव पालव मार्ग एक दिशा आहे. तसेच शिंगटे मास्तर चौक ते कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) बंद राहील.
मुंबईकरांनी 'या' पर्यायी मार्गाचा वापर करावा!
- डॉ.बी.ए. रोड, उत्तर वाहिनीवरील वाहने हंसराज राठोड चौक (बावला कंपाऊंट जंक्शन) - उजवे वळन - टि.बी कदम मार्ग - जी.डी आंबेडकर मार्ग - श्री साईबाबा रोड मार्ग - भारतमाता जंक्शनकडे जातील.
- डॉ.बी.ए. रोड, दक्षिण वाहिनीवरून सीएसएमटीकडे जाणारी वाहने लालबाग ब्रिजचा वापर करतील.
- दक्षिण वाहिनीवरील वाहने कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) - उजवे वळण - करी रोड - ब्रिज - शिंगटे मास्तर चौक - डावे वळण - एन. एम. जोशी मार्ग - कॉम्रेड गणाचार्य जंक्शन (चिंचपोकळी जंक्शन) - अब्दुल हमिद अन्सारी चौक (खडा पारसी) इथून दक्षिण मुंबीईकडे जातील.
- दक्षिण वाहिनीवरील वाहने कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) - डावे वळण घेवून - जिजीभाई लेन - सदाशिव गोपाळ नाईक चौक - श्री साईबाबा मार्ग - साई बाबा टी जंक्शन - डावे वळण - जी. डि. आंबेकर स्लीप रोड - व्हेटरनरी कॉलेज गेट - उजवे वळण - जी. डी. आंबेकर मार्ग - श्रावण यशवंते चौक - बॅरीस्टर नाथ पै मार्ग - पी डिमेला रोमने दक्षिण मुंबईकडे जातील.