Wednesday, March 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMumbai Railway Projects : 'मुंबईकरांचा प्रवास सुखद', मुंबईच्या १२ रेल्वे प्रकल्पांची घोषणा

Mumbai Railway Projects : ‘मुंबईकरांचा प्रवास सुखद’, मुंबईच्या १२ रेल्वे प्रकल्पांची घोषणा

मुंबई : मुंबईकरांसाठी रेल्वे मंत्रालयाने एक मोठी बातमी दिली आहे. मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकल सेवेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे. आता मुंबईकरांचा प्रवास सुखद होणार आहे. मुंबई लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढवणार आहेत. मुंबईकरांचा वेळ आता खूप वाचणार आहे. मुंबईसाठी सुरु असणाऱ्या १२ रेल्वे प्रकल्पांची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवरुन दिली आहे. एकूण १६ हजार २४० कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला दिलेल्या या प्रकल्पांबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.

कोणते आहेत हे १२ प्रकल्प ?

१. सीएसटीएम ते कुर्ला अशी पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन करण्यात येणार आहे.
२. मुंबई सेंट्रल ते बोरीवली अशी सहावी रेल्वे लाईन होणार आहे. हा प्रकल्प ३० किलोमीटरचा आहे.
३. हर्बल लाईन गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे.
४. बोरवली ते विरार अशी पाचवी आणि सहावी लाईन करण्यात येणार आहे.
५. विरार ते डाहून रोड अशी तिसरी आणि चौथी लाईन करण्यात येणार आहे. हा प्रकल्प ६४ किलोमीटरचा आहे.
६. पनवेलपासून कर्जतरपर्यंत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई लोकल रायगड जिल्ह्यास जोडली जाणार आहे.
७. ऐरोली-कळवा हा एलिव्हेटेड लिंकचा प्रकल्प आहे. ३.३ किमी लांबीचा प्रकल्प आहे. वाशी-बेलापूर आणि कल्याण दरम्यान अखंड रेल्वे कनेक्शन यामुळे होणार आहे.
८. कल्याण आणि आसनगाव रेल्वे स्थानकांदरम्यानचा चौथा रेल्वे मार्ग तयार होणार आहे. हा प्रकल्प ३२ किलोमीटरचा आहे.
९. कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग होणार आहे. हा प्रकल्प १४ किलोमीटरचा आहे.
१०. कल्याण-कसारा तिसरी रेल्वे लाईन होणार आहे. यामुळे कल्याण-कसारा उपनगरी आणि मेल एक्सप्रेस मार्गावरील गर्दी कमी होणार आहे.
११. वसई येथे इंजिन बदलावे लागते. त्यामुळे नायगाव-जुई डबल कॉर्ड लाईन बांधण्यात येणार आहे. त्याचा फायदा कोकण रेल्वे, दक्षिण रेल्वेसाठी होणार आहे.
१२. निळजे ते कोपर दरम्यानच्या ५ किमीची कॉर्ड लाइन होणार आहे. वसई ते पनवेल दरम्यानचा रेल्वे प्रवास सुमारे १५ ते २० मिनिटांनी कमी होईल.

https://x.com/AshwiniVaishnaw/status/1829572663523590257

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -