लखनऊ : उत्तरप्रदेशच्या लखनऊमधील निगोहा येथून लव्ह जिहादचे (Love Jihad) प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने ओळख लपवून एका महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. यानंतर त्याने तिचा धर्म बदलला आणि आता तिला तिहेरी तलाक दिला.
पिडीतेच्या आरोपानुसार आरोपी ताज मोहम्मदने आपले नाव बबलू असल्याचे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याचे नाव बबलू नसून ताज मोहम्मद असल्याचे समजताच तिने विरोध केला. यानंतर ताजने तिला मारहाण करून इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले आणि तिचे नाव नाझिया ठेवले. त्यानंतर तिने त्याच्यासोबत लग्न केले, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. यादरम्यान ती गरोदरही राहिली. मग ती कशीतरी आपली उदरनिर्वाह करू लागली. राजीव गांधी महिला विकास प्रकल्पात कष्ट करून पैसे गोळा केल्याचे पीडितेने सांगितले.
ताज मोहम्मद या महिलेकडून पैसे घेऊन सौदी अरेबियाला गेला. मग हळूहळू त्याचे येणे बंद झाले. नंतर असे उघड झाले की ताजने साजिया नावाच्या मुलीशी लग्न केले आहे. साजिया लखनऊच्या टोला मलौली, गोसाईगंज येथील रहिवासी आहे. पिडीतेने त्याच्या दुसऱ्या लग्नाला विरोध केला असता तिला बेदम मारहाण करण्यात आली. ताज मोहम्मदने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला आणि एके दिवशी तिला घरातून हाकलून दिले. या घटनेनंतर ती पिडीता आपल्या भावाकडे आश्रयाला पोहचली. दरम्यान, एके दिवशी ताज मोहम्मद भाईच्या घरी आला आणि भांडू लागला. त्यानंतर तीन वेळा तलाक देऊन तलाक दिला. पतीसोबत राहण्याचा मार्ग बंद झाल्याचे पीडितेने सांगितले. या संपूर्ण घटनाक्रमानंत पिडीतेने पोलिस स्टेशन गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली.
यासंदर्भात पोलिस अधिकारी अनुज तिवारी यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११५ (२), मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण कायदा २०१९ चे कलम ३ आणि ४ तसेच उत्तर प्रदेश प्रतिबंध २०२१ च्या कलम ३ आणि ५(१) अंतर्गत बेकायदेशीर धर्मांतरणाची कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे तिवारी यांनी सांगितले.