नवी दिल्ली : भारतीय हॉकी टीम पॅरिस ऑलिम्पिक-२०२४ मध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. चीनमध्ये होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया सहभागी होणार आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या हॉकीच्या १८ सदस्यीय संघाची देखील घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व कर्णधार हरमनप्रीत सिंह करणार आहे.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये होणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंह करणार आहे. तर उपकर्णधार विवेक सागर प्रसाद करणार आहे. ही स्पर्धा ८ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. तर या स्पर्धेत १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे.
चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारताच्या हॉकी संघाचे वेळापत्रक
८ सप्टेंबर – चीन
९ सप्टेंबर – जपान
११ सप्टेंबर – मलेशिया
१२ सप्टेंबर – कोरिया
१४ सप्टेंबर – पाकिस्तान
१६ सप्टेंबर – सेमी फायनल
१७ सप्टेंबर – फायनल
भारतीय संघ
गोलकीपर – कृशन बहादूर , सूरजा करकेरा
डिफेंडर – जरनप्रीत सिंह, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंह (कर्णधार),जुगराज सिंह, संजय आणि सुमीत
मिडफील्डर – राजकुमार पाल, नीलाकांता शर्मा, विवेक सागर प्रसाद (उप कर्णधार), मनप्रीत सिंह आणि मोहम्मद राहिल
फॉरवर्ड – अभिषेक सुखजीत सिंह, अराइजीत सिंह हुंडल, उत्तम सिंह (ज्यूनिअर संघाचा कर्णधार) आणि गुरजोत सिंह
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…