Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडी5th Generation Fighter Jet : भारतात स्वदेशी फायटर जेटचा प्रोग्रॅम सुरु, हे...

5th Generation Fighter Jet : भारतात स्वदेशी फायटर जेटचा प्रोग्रॅम सुरु, हे विमान इतकं घातक असेल की…

नवी दिल्ली : भारताची आता अगदी वेगाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. भारताच संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता हे मुख्य लक्ष्य आहे. भारतात आता त्या दृष्टीनेच एका स्वदेशी फायटर विमानाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळेच चीनला कडवी टक्कर देता येईल. चीनवर जरब बसवण्यासाठी भारत आता पाचव्या पिढीच AMCA फायटर विमान बनवणार आहे. २०२८ पर्यंत स्वदेशी बनावटीच्या Advanced Medium Combat Aircraft च पहिलं प्रोटोटाइप बनवण्याची योजना आहे. भारतामधलं हे पाचव्या पिढीच पहिलं AMCA स्टेलथ फायटर जेट असणार आहे. २७ टन जवळपास या विमानाच वजन असेल. हे विमान जास्त वजनाची शस्त्र घेऊन उड्डाण करण्यासाठी सक्षम असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाचव्या पिढीच स्टेल्थ फायटर जेट AMCA बनवण्यासाठी कॅबिनेट कमिटीने हिरवा झेंडा दाखवलाय. १५ हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आले आहेत. इंडियन एअर फोर्स आणि DRDO मध्ये या संदर्भात नुकतीच बैठक झाली. तिथे AMCA ची डिजाईन, डेवलपमेंट आणि योजनेबद्दल सविस्तर चर्चा झाली. या विमान निर्मिती प्रोजेक्टच्या आराखड्याचा खूप बारीक पद्धतीने आढावा घेण्यात आलाय.

कसं असेल हे विमान?

AMCA हे खास क्षमतांनी सुसज्ज असलेलं फायटर जेट असणार आहे. हे विमान शत्रुला ट्रॅक करता येऊ नये, यासाठी त्यामध्ये काही खास फिचर्स असतील. जनरल इलेक्ट्रिक ४१४ (GE-414) दोन इंजिन असतील. AMCA विमान बनल्यानंतर भारताचा रशिया, अमेरिका आणि चीन या देशांच्या पंक्तीत समावेश होईल.

इंडियन एअर फोर्सची योजना काय?

शेजारी देशांकडून असलेली आव्हान लक्षात घेऊन भारताला हे फायटर जेट लवकरात लवकर विकसित करायचं आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या सुद्धा या प्रोजेक्टमध्ये सहभागी होतील. ६५ हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करण्याच्या दृष्टीने AMCA विमान बनवण्यात येईल. भारतीय नौदलासाठी आणि इंडियन एअर फोर्स हे विमान विकसित करण्यात येईल. इंडियन एअफोर्स AMCA विमानाच्या ७ स्क्वॉड्रन बनवण्याचा विचार करत आहे.

भारताकडे सध्या कुठलं सर्वाधिक घातक फायटर विमान आहे?

अमेरिकाकडे F-३५ आणि रशियाकडे Su-५७ च्या रुपाने पाचव्या पिढीची स्टेल्थ फायटर विमाने आहेत. सध्या भारताकडे सर्वात अत्याधुनिक म्हणजे राफेल फायटर विमान आहे. ४.५ जनरेशनच हे विमान फ्रान्सकडून विकत घेतलय.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -