त्याऐवजी मिळणार आता ९ जीवनावश्यक वस्तू
नवी दिल्ली : केंद्र सरकार देशातील गरजूंना रेशनकार्डद्वारे मोफत रेशन देते. यामध्ये शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ दिला जातो, मात्र त्यात मोठा बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोफत तांदूळ देण्याऐवजी आता इतर ९ वस्तू देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशनही पुरविले जाते. मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास ९० कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार रेशनवरील मोफत तांदूळ बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी इतर ९ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. यामध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल, अशी सरकारला आशा आहे.
शिधापत्रिकेसाठी अर्ज कसा करावा
तुमच्याकडे अद्याप शिधापत्रिका नसेल, परंतु तुम्ही त्यासाठी पात्र असाल, तर तुम्ही ते जारी करण्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल. तुम्ही या विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करू शकता. अर्ज भरताना, सर्व आवश्यक माहिती बरोबर असल्याची खात्री करा. फॉर्ममध्ये मागितलेली संबंधित कागदपत्रेही तुम्हाला जोडावी लागतील. तुमचा फॉर्म आणि कागदपत्रे तयार झाल्यानंतर, तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात जमा करा.