Tuesday, July 1, 2025

Chintamani Aagman 2024 : चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक; साजिरवाणं रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Chintamani Aagman 2024 : चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक; साजिरवाणं रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
मुंबईतील बहुप्रतिष्ठीत चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा गाजावाजात पार पडला.


यंदा गणपतीच्या मूर्तीचं स्वरुप काहीसं हटके करण्यात आलंय.


लाडक्या चिंतामणीचं देखणं रुप भरभरुन पाहता यावं, यासाठी आगमन सोहळ्याला लाखो भक्तांची गर्दी पाहायला मिळतेय.


चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं यंदाचं १०५वं वर्ष आहे.


बाप्पाची मूर्ती सुंदर अशी डोळ्याचं पारणं फेडणारी आहे.


चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ म्हणजे, मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक. त्यामुळे चिंतामणी गणपती गणेशोत्सव काळात भक्तांचं विशेष आकर्षण आहे.


लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा ढोल-ताशांच्या गजरात पार पडला.


तसेच, बाप्पाचा मंडपदेखील भव्य पद्धतीने सजवण्यात येणार आहे.


३१ ऑगस्टला जल्लोषात बाप्पाचा आगमन सोहळा पार पडला आहे.


बाप्पाच्या पहिल्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी चिंचपोकळीच्या नगरीत पाहायला मिळाली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >