Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDhangar reservation : धनगर समाजाचा पुन्हा एल्गार; ना नेता ना पक्ष; धनगर...

Dhangar reservation : धनगर समाजाचा पुन्हा एल्गार; ना नेता ना पक्ष; धनगर आरक्षण एकच लक्ष

बेमुदत उपोषणाची घोषणा

सोलापूर : धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी (Dhangar reservation) पुन्हा आंदोलन पुकारले आहे. ९ सप्टेंबरपासून पंढरपूर येथे राज्यस्तरीय बेमुदत उपोषण सुरू होणार आहे. सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल कारंडे यांनी ही घोषणा केली आहे. “ना नेता ना पक्ष; धनगर आरक्षण एकच लक्ष” या घोषवाक्यासह आंदोलनाला सुरुवात होईल.

आंदोलनाची तयारी म्हणून १ सप्टेंबर रोजी जेजुरीत मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या दर्शनानंतर धनगर बांधव पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे उपोषण सुरू होईल. धनगर समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये त्यांना अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी आहे.

सध्या, धनगर समाज ओबीसी (इतर मागासवर्गीय) प्रवर्गात आरक्षित आहे, परंतु त्यांना एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे, अशी त्यांची दीर्घकालीन मागणी आहे. यासाठी त्यांनी राज्यभरात आंदोलन केले आहे. कारंडे यांनी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांवर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर निष्क्रियता दाखवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता सर्व धनगर समाज एकत्र येऊन सामूहिक नेतृत्वाखाली हे उपोषण करणार आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्याचा आणि धनगर समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्याचा त्यांचा उद्देश आहे. उपोषण सुरू होण्यापूर्वी जेजुरीत भंडारा उधळून, खंडेरायाचे दर्शन घेतले जाईल. धनगर समाजाचे हे आंदोलन राज्यभरातील राजकारणात एक महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -