Thursday, July 10, 2025

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवासाठी पुण्यानंतर नाशिक प्रशासन सज्ज! 'हा' महत्त्वाचा निर्णय लागू

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवासाठी पुण्यानंतर नाशिक प्रशासन सज्ज! 'हा' महत्त्वाचा निर्णय लागू

नाशिक : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. संपूर्ण राज्यभरात लाखो भाविकं लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी करत आहेत. अशातच प्रत्येक शहरातील पोलीस प्रशासन देखील गणेशाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. आगामी गणेशउत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासन आणि पोलिसांनी मोठी खबरदारी घेवून यंदा गणेशोत्सवात डोळे दिपवणाऱ्या लेझर लाइट शो विसर्जन मिरवणुकीवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता नाशिक प्रशासनही गणेशोत्सवाबाबत सज्ज झाले असून महत्वाचा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी राज्यातील काही ठिकाणच्या गणेश विसर्जन मिरवुकीतील लेझर लाइट शोमुळे काही भक्तांच्या डोळ्यांना इजा झाली होती. पुणे आणि नाशिक शहरातून मोठ्या प्रमाणात डोळ्यांना इजा झाल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे नेत्ररोग तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली होती. या प्रकारानंतर पुणे प्रशासन आणि पोलिसांनी मोठी खबरदारी घेवून यंदा गणेशोत्सवात डोळे दिपवणाऱ्या लेझर लाइट शो विसर्जन मिरवणुकीवर बंदी घालण्याचे आदेश दिले. तर पुण्यानंतर आता नाशिकमध्येही गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत लेझरचा वापर करण्यास बंदी घालण्यात आल्याचे नाशिक पोलीस प्रशासनाने सांगितले.


दरम्यान, पुण्यासह नाशिकमधील सर्व गणेशोत्सव महामंडळांनी देखील लेझर शो करणार नसल्याचे मान्य केले आहे. तसेच गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या नियमांचे पालन करून डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment