पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
अमरावती : श्रावणातील शेवटच्या सोमवारी अमरावती जिल्हयातील दर्यापूर शहरात मोठ्या प्रमाणावर कावड यात्रा उत्सव साजरा होतो. कायदा व सुव्यवस्थाच्या अनुषंगाने दर्यापूर ते मुर्तिजापूर मार्गावर वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी सौरभ कटियार यांनी जारी केला आहे.
दर्यापूर ते मुर्तिजापूर या रोडवर कावड यात्रा मंडळ व शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. सदर रोडचे रुंदीकरण झाल्याने रोडवर वाहतुक वेगाने सुरू राहते. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेकरिता तसेच कावड यात्रा मिरवणूक शांततेत पार पडावी या करीता दर्यापूर ते मुर्तिजापूर मुख्य मार्ग १ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेपासून ते २ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत दर्यापूर-आमला-आसरा फाटा-बोटा-हिरापूर ते मुर्तिजापूर मार्गे (फक्त एस.टी. बस वाहतुक वगळून) वळविण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल.