मुंबई : पालिकेतर्फे के पूर्व विभागात वेरावली जलाशय २ येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या आगम वाहिनीवरील झडपा बदलण्याचे काम सोमवारी पहाटे १ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या १२ तासांच्या कालावधीत म्हणजेच सोमवार रोजी रात्री ०१ वाजेपासून ते दुपारी ०१ वाजेपर्यंत के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर, के पूर्व विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
के पूर्व विभाग– मजास गाव, समर्थ नगर, सर्वोदय नगर, इंदिरा नगर, जनता वसाहत, हिंद नगर, दत्त टेकडी, शिव टेकडी, प्रताप नगर, श्याम नगर, मजास बस आगार, मेघवाडी, प्रेम नगर, वांद्रे भूखंडाचा काही भाग, रोहिदास नगर, गांधी नगर, आर. आर. ठाकूर मार्ग, आनंद नगर, ओबेरॉय टॉवर, जोगेश्वरी रेल्वे स्थानक (पूर्व) ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानचा परिसर, नटवर नगर, पी. पी. डायस कंपाउंड (पाणीपुरवठा बंद राहील)
के पूर्व विभाग– महाकाली मार्ग, पूनम नगर, गोनी नगर, तक्षशिला मार्ग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण वसाहत, दुर्गा नगर, पेपर बॉक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर-ए-पंजाब, बिंद्रा संकूल, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर सुंदर नगर, गौतम नगर, मॉर्डन बेकरी, प्रजापूरपाडा , त्रिपाठी नगर, मुन्शी वसाहत, बस्तीवाला वसाहत, अचानक वसाहत, जिल्हधिकारी वसाहत, सारिपूत नगर , दुर्गानगर, मातोश्री क्लब , दत्त टेकडी, ओबेराय स्प्लेंडर, केलतीपाडा, गणेश मंदिर परिसर, जोगेश्वरी विक्रोळी जोड मार्ग , बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचानगर , वांद्रे वसाहत, हरीनगर, शिवाजीनगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी (पाणीपुरवठा कमी दाबाने राहील)
के पश्चिम विभाग– सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय मार्गिका, स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकूशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी बाजार, भर्डावाडी, नवरंग चित्रपटगृहाच्या मागे, अंधेरी गावठाण, आंब्रे उद्यान पंप व गझधर पंप, गिलबर्ट हिल (भाग), तीन नळ, गावदेवी डोंगरी मार्ग, उस्मानिया डेअरी (भाग) पटेल इस्टेट, वैशाली नगर, सौराष्ट्र पटेल इस्टेट, अमृत नगर, अजीत ग्लास उद्यान, आक्सा मस्जिद मार्ग, बेहराम बाग मार्ग, गुलशन नगर, राघवेंद्र मंदिर मार्ग, रिलीफ मार्ग, हरियाणा बस्ती (पाणीपुरवठा बंद राहील)