मुंबई: शुक्रवारचा दिवस धन आणि वैभवाची देवी माता लक्ष्मीच्या पुजेसाठी समर्पित केला जातो. ज्यांना धन-संपत्तीचा लाभ हवा आहे ते लोक शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेचे व्रत करतात. ज्या व्यक्तीवर लक्ष्मी मातेची कृपा असते त्या व्यक्ती धन-दौलतीची कमतरता राहत नाही. कोणतेही आर्थिक संकट येत नाही. लक्ष्मी कृपेने दारिद्र्य दूर होते.
शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी मातेला कमळ आणि लाल गुलाबाचे फूल चढवा. अक्षता, लाल सिंदूर, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करा. तुपाचा दिवा लावा. लक्ष्मी मातेचे पुजेमध्ये शंख, पिवळ्या कवड्या यांचा वापर करा.
लक्ष्मी मातेसोबत तुम्ही गणपती बाप्पा, श्रीयंत्र आणि धनपती कुबेराचीही पुजा करू शकता. देवी लक्ष्मीला मखाण्याची खीर, सफेद मिठाई, बत्तासे यांचा नैवेद्य अर्पण करा. यानंतर महालक्ष्मी स्तोत्राचे पठण करा.
महालक्ष्मी स्तोत्र
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते।
शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरि।
सर्वपापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
सर्वज्ञे सर्ववरदे देवी सर्वदुष्टभयंकरि।
सर्वदु:खहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि।
मन्त्रपूते सदा देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि।
योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे।
महापापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणी।
परमेशि जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
श्वेताम्बरधरे देवि नानालंकारभूषिते।
जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं य: पठेद्भक्तिमान्नर:।
सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा।।