गांधीनगर: गुजरताच्या सौराष्ट्रपासून ते कच्छ पर्यंत निसर्गाचा कहर सुरू आहे. वडोदरापासून ते राजकोट पर्यंत जामनगर पासून ते खेडा पर्यंत बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. वडोदराच्या सयाजीगंज परिसरात ८ फुटापर्यंत पाणी भरले आहे. लोक दोन दिवसांपासून घरात अडकले आहेत. पाणीही नाही आहे आणि वीजही नाही आहे.
अशातच सैन्याचे जवान देवदूत बनून मदतीसाठी येत आहेत. दोरी आणि बादलीच्या मदतीने प्रत्येक घरात पाणी आणि जेवण पोहोचवले जात आहे. गुजारतमधील गंभीर स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संपर्कात आहेत. पंतप्रधान मोदींनी फोनवरून विश्वास दिला की केंद्र सरकार हरतऱ्हेची मदत करण्यास तयार आहे.
गुजरातमध्ये चार दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण पावसामुळे हाहाकार माजला आहे. आज अरबी समुद्रात चक्रीवादळ थैमान घालू शकते. यामुळे हवामान विभागाने ओडिशा केरळमध्येही मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. गेल्या ८० वर्षात हे पहिलेच वादळ आहे जे जमिनीवर निर्माण झाले आहे. दरम्यान गेल्या तीन दिवसांत गुजरातमध्ये पावसामुळे ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.