Thursday, March 27, 2025
Homeक्राईमUP News : उत्तरप्रदेशातील मदरशात नकली नोटांची छपाई!

UP News : उत्तरप्रदेशातील मदरशात नकली नोटांची छपाई!

मौलवीसह चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

प्रयागराज : उत्तरप्रदेशातील (UttarPradesh) प्रयागराज येथे नकली नोटांचा (Fake Money) कारखाना मिळाला आहे. मदरशातील एका खोली सुरू असलेल्या या कारखान्यात १०० रुपयांच्या नोटांची छपाई सुरू होती. याप्रकरणी पोलिसांनी मौलवीसह चौघांना अटक केली आहे.

प्रयागराजच्या सिव्हील लाईन्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात नकली नोटा छापल्या जात असल्याची गोपणीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली. नकली नोटा छापण्याची धागेदोरे एका मदरसापर्यंत आले. सर्व पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी मदरसामध्ये छापा टाकला. त्यावेळी एका खोलीत नोटांची छापाई सुरु होती.

पोलिसांनी मदरसाच्या मौलवीसह ४ जणांना अटक केली आहे. त्या ठिकाणावरुन स्कॅनर, प्रिंटिंग मशीन आणि १००-१०० रुपयांच्या १ लाख ३० हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी मदरशाचा प्राचार्य मौलवी मोहम्मद तफसीरुल आरीफीनसह मोहम्मद अफजल, मोहम्मद साहिद आणि मास्टर माइंड जाहीर खान उर्फ अब्दुल जाहीर यांना अटक करण्यात आली. या मदरशात गेल्या ३ महिन्यांपासून नकली नोटा छापण्याचा कारखाना सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम १७८,१७९, १८०, १८१, १८२ (१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीत मौलवी मोहम्मद तफसीरूल हा ओडिशाचा रहिवाशी आहे. या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

दरम्यान, नकली नोटाच्या या रॅकेटचा संबंध आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटनांसोबत असण्याची शक्यता आहे. आरोपींच्या फोनच्या ब्राउजिंग हिस्ट्रीमध्ये महाकुंभसंदर्भात लिंक मिळाले आहेत. प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभात नकली नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आणण्याची तयारी आरोपींनी केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -