Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीJio Reliance : जिओ धारकांसाठी आनंदवार्ता! जिओ देणार १०० जीबी मोफत क्लाउड...

Jio Reliance : जिओ धारकांसाठी आनंदवार्ता! जिओ देणार १०० जीबी मोफत क्लाउड स्टोरेज

मुकेश अंबानी यांची घोषणा

मुंबई : रिलायन्स जिओ (Jio Reliance) आपल्या ग्राहकांसाठी मोठी ऑफर घेऊन आली आहे. गुगलसह इतर कंपन्या काही जीबी मोफत देतात आणि त्यानंतर क्लाउड स्टोरेजसाठी शुल्क आकारतात. परंतु रिलायन्स जिओ लवकरच आपल्या ग्राहकांना १०० जीबीपर्यंत मोफत क्लाउड स्टोरेजची (Free Cloud Storage) सुविधा देणार आहे. या स्टोरेजमध्ये फोटो, व्हिडिओ किंवा कोणतेही डॉक्युमेंट्स साठवता येतील. ही माहिती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ४७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअरधारकांना संबोधित करताना चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स जिओ ही कंपनी पूर्ण एआय कव्हर करणारी उपकरणे आणि प्लॅटफॉर्म्सचा एक व्यापक सेट विकसित करत आहे, ज्याला ‘जिओ ब्रेन’ म्हटले जाते. कंपनी ‘एआय एव्हरीव्हेअर फॉर एव्हरीवन’ या थीमवर हे लॉन्च करणार आहे. सर्व ग्राहकांना भारतातील एआय अनुप्रयोग अधिक परवडण्यासाठी जिओकडून ही नवी योजना आखली जात आहे. त्याचबरोबर जामनगरमध्ये पूर्णपणे रिलायन्सच्या हरित ऊर्जेवर चालवले जाईल, अशी ‘गीगावॅट-स्केल एआय-सज्ज डेटा सेंटर’ स्थापन करण्याची योजना आखत आहोत, असे अंबानी यांनी म्हटले.

कोणत्या एआयची सेवा मिळणार?

जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी अनेक नवीन एआय सेवांची घोषणा केली. यात जिओ टीवीओएस, HelloJio, Jio Home IoT सोल्यूशन, JioHome अॅप आणि Jio Phonecall AI यांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -