मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्रात आले आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टला (Global Fintech Fest) मोदींनी हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी फिनटेक क्रांतीवर संशय घेणाऱ्या विरोधकांवर मोदींनी खोचक (Maharashtra) टीका केली. सरस्वती देवी ज्यावेळी बुद्धी वाटत होती त्यावेळी हे लोक रस्त्यातच राहिले. आता देशात सणासुदीचे आणि चांगले दिवस सुरू झाले आहेत. जन्माष्टमीही उत्साहात साजरी झाली. लोकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था आणि मार्केटमध्येसुद्धा दिसून येत आहे.
ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल मुंबई शहरात होत आहे. एक वेळ अशी होती जेव्हा विदेशी लोक आपल्या भारतात यायचे आणि येथील सांस्कृतिक विविधता पाहून थक्क व्हायचे. आताही विदेशी लोक भारतात येतात आणि येथील फिनटेक विविधता पाहून थक्क होतात. फिनटेक क्षेत्रात मागील दहा वर्षांच्या काळात ३१ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे.
भारतात स्वस्त मोबाइल फोन, डेटा आणि झिरो बॅलन्स जनधन खात्यांचा उल्लेख करत मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. मोदी म्हणाले, तुम्हाला आठवत असेल की, काही लोक संसदेत नेहमी प्रश्न विचारत होते. स्वतःला अति आणि जास्त बुद्धीमान समजणारे लोक प्रश्न विचारत होते. सरस्वती देवी ज्यावेळी बुद्धी वाटत होती तेव्हा बहुधा हे लोक रस्त्यात सर्वात आधी उभे होते. त्यांच्याकडून असं म्हटलं जायचं की भारतात इतक्या बँका, इंटरनेट नाहीये. इतकंच काय तर भारतात वीजसुद्धा नाही अशी हेटाळणी या लोकांकडून केली जात होती.फिनेटक क्रांती कशी होणार? असा प्रश्नसुद्धा त्यांच्याकडून उपस्थित केला जात होता. माझ्यासारख्या चहावाल्याला असं विचारलं जात होतं. पण आज तुम्ही बघत आहात एका दशकाच्या काळातच भारतात ब्रॉडबँड युजर्सची संख्या सहा कोटींवरून थेट ९४ कोटी झाली आहे. आज आधारकार्ड नसलेला असा एकही भारतीय व्यक्ती क्वचितच सापडेल. आज ५३ कोटींपेक्षा सर्वाधिक लोकांचे जनधन खाते आहेत. संपूर्ण जगात भारत यूपीआय फिनटेकच सर्वात मोठ उदहारण बनलाय. आज गाव असो किंवा कोणतं शहर, सर्दी असो किंवा गरमी, पाऊस असो किंवा हिम वर्षात भारतात बँकिंग सेवा २४ तास १२ महिने चालू असते”, आपण दहा वर्षात युरोपियन यूनियनच्या लोकसंख्येइतक्या लोकांना बँकिंग सिस्टिमशी जोडल्याचे मोदींनी म्हटलंय.
मुद्रा योजनेचा सर्वात मोठा फायदा महिलांना
“जनधन योजना महिला सबलीकरणाच खूप मोठं माध्यम बनली आहे. जनधन योजनेमुळे २९ कोटीपेक्षा जास्त महिलांची बँकखाती उघडली गेली आहेत. महिलांना बचत आणि गुंतवणूकीची या खात्यात नवीन संधी मिळाली. मायक्रोफायनान्सची सर्वात मोठी मुद्रा योजना या जनधन खात्याच्या विचारावर लॉन्च केली. या योजनेतून आतापर्यंत २७ ट्रिलियन पेक्षा अधिक कर्ज दिलय. ७० टक्के महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. जनधन कार्यक्रमाने महिलांसाठी आर्थिक सबलीकरणाचा पाया रचला आहे” असं पीएम मोदी म्हणाले आहेत.
सायबर फसवणुकीचे प्रकार रोखले
सायबर फसवणुकीच्या प्रकारांना आम्ही आळा घालण्याचं काम केलंय. बँकिंग क्षेत्राला अगदी गावखेड्यात घेऊन गेलो. आज शेकडो अशा सरकारी योजना आहेत ज्यांचा फायदा डिजिटल रुपात देशातील जनतेला मिळत आहे. कोरोना संकटाच्या काळातही आपली बँकिंग सिस्टिम बंद पडली नाही. करेंसीपासून क्यू आर कोड पर्यंतचा प्रवास पार करण्यात बराच काळ गेला पण आज आपण रोजच नवनवीन गोष्टी पाहत आहोत.