जव्हार(मनोज कामडी – प्रगती प्रतिष्ठान जव्हार येथे रविवार दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन केले आहे.
गोविंदा रे गोपाळा!
सनातन हिंदु धर्मात सर्वांचे लाडके दैवत म्हणजे भगवान कृष्ण. भक्त प्रेमाने त्यांना गोविंद,गोपाल,कान्हा अश्या विविध नावांनी जाणतात आणि आपले गाऱ्हाणे हक्काने मांडतात. भगवान कृष्ण भारत भूमीत सर्वत्र आराध्य दैवत आहेत.गुजरात मध्ये द्वारकाधीश ,महाराष्ट्रात विठ्ठल,कर्नाटकात उडुपी कृष्ण,ओरिसा मध्ये जगन्नाथ आणि उत्तर प्रदेशात ठाकुरजी असे सर्वत्र ते परम श्रध्देने भजले जातात.भगवंत अजन्मा आहेत तरीही भक्तांसाठी आपल्या दिव्य धामातून पृथ्वीवर अवतरित होतात. अवघ्या ५००० वर्षापूर्वी भगवंत अवतरले त्यांनी विविध मनमोहक लीला केल्या.
भगवंतांनी केलेल्या अनेक दिव्य काऱ्यांपैकी एक म्हणजे भगवद गीतेचा उपदेश. गीतेमध्ये भगवंत मानवाला समाधान आणि सुखाचे जीवन जगत ,भव सागर कसा ओलांडता येईल यावर विस्तारित बोलले,गीतेमध्ये चौथ्या अध्यायात भगवंत सांगतात,जन्म कर्म च मे दिव्यम
एवं यो वेत्ति तत्त्वतः ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म
नैति मामेति सोऽर्जुन ॥
हे अर्जुना, ज्याला माझ्या स्वरूपाचे आणि क्रियांचे दिव्य स्वरूप माहीत आहे, तो देह सोडल्यानंतर पुन्हा या भौतिक जगात जन्म घेत नाही, तर तो माझ्या शाश्वत धमाची प्राप्ती करतो. केवळ एखाद्याने भगवंताच्या जन्म आणि दिव्य कार्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरीही तो भव बंधनातून मुक्त होतो. सर्वांना भगवंताना शास्त्र शुध्द पद्धतीने आणि प्रामाणिक परंपरेतून जाणण्याची, त्यांची भक्ती करण्याची संधी आणि मार्गदर्शन मिळावे. यासाठी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे जगभर प्रचार ,प्रसाराचे कार्य केले जाते. याचाच भाग म्हणून जव्हार शहरात गेल्या ५ वर्षापासून सत्संग दर गुरुवारी प्रगती प्रतिष्ठान येथे घेतला जातो. या सत्संगातून भाविकांना फार चांगले अनुभव आलेले आहेत. बऱ्याच जणांना व्यसन सोडणे , स्वभाव बदलणे,सुखी कौटुंबिक जीवन जगायला प्रेरणा मिळाली आहे.
आपल्या लाडक्या कृष्णाच्या भक्तीने कृतज्ञ होऊन जव्हार भक्तगण आनंदाने जन्माष्टमी साजरी करतात. हे मोठ्या जन्माष्टमी उत्सवाचे ३ रे वर्ष असून सर्वत्र आनंद,उत्साहाचे वातावरण आहे आणि भाविक या कार्यक्रमासाठी उत्सुक असून
या सोहळ्यात श्री विग्रहांचा अभिषेक,हरिकथा,कीर्तन, सांस्कृतीक कार्यक्रम आणि सर्व भाविकांसाठी जेवण प्रसाद लाभ घेण्यासाठी सर्वांनी या जन्माष्टमी उत्सवात सहभागी होऊन आनंद लुटण्यासाठी जव्हार भक्तांकडून आवाहन करण्यात येत आहे.