Wednesday, August 6, 2025

BSNLचा जबरदस्त प्लान, दररोजी २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

BSNLचा जबरदस्त प्लान, दररोजी २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

मुंबई: देशातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवल्यानंतर आता हजारो युजर्स बीएसएनएलच्या दिशेने आकर्षित होत आहे. अशातच बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवनवे प्लान्स सादर केले आहेत. देशात बीएसएनएलने आपले नेटवर्क वेगाने वाढवण्याचे काम सुरू केले आहे.


मार्च २०२५ पर्यंत देशभरात बीएसएनएल ४जी सर्व्हिस सुरू होईल. अशातच आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या नव्या प्लानबद्दल सांगत आहोत ज्यात तुम्हाला दररोज २ जीबी इंटरनेट डेटा सोबतच अनलिमिटेड कॉलिंगही मिळत आहे. सोबतच याची व्हॅलिडिटी ५ महिन्यांपर्यंत आहे.



बीएसएनला ४०० रूपयांपेक्षा कमीचा प्लान


बीएसएनएलच्या प्लानची किंमत ३९७ रूपये आहे. हा प्लान त्या लोकांसाठी शानदार मानला जात आहे ज्यांना सेकंडरी सिम म्हणून बीएसएनएलचे कार्ड वापरायचे आहे. या स्वस्त प्लानची व्हॅलिडिटी ५ महिन्यांची आहे. म्हणजे एकदा रिचार्ज केल्यावर १५० दिवसांपर्यंत रिचार्ज करावे लागणार नाही.



मिळतात हे फायदे


बीएसएनएलच्या ३९७ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला अनेक फायदे मिळतात. या प्लानमध्ये युजर्सला ३० दिवसांसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. याचा अर्थ कोणत्याही नेटवर्कवर तुम्ही कॉल करू शकता. दरम्यान कंपनी युजर्सला १५० दिवसांपर्यंत फ्री इनकमिंग कॉल्सची सुविधा देते. म्हणजेच हा प्लान खरेदी केल्यानंतर तुम्हाला नंबर बंद होण्याचे टेन्शन नाही.


या प्लानमध्ये तुम्हाला पहिल्या ३० दिवसांपर्यंत दररोज २ जीबी डेटा वापरायला मिळेल. सोबतच अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा िळते. डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला 40Kbps चा स्पीड मिळेल. या प्लानमध्ये दररोज १० फ्री एसएमएस मिळतात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >