Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडामैदानात उतरण्यासाठी शमी उत्सुक, पुनरागमनाबाबत आले मोठे अपडेट

मैदानात उतरण्यासाठी शमी उत्सुक, पुनरागमनाबाबत आले मोठे अपडेट

मुंबई: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापती आणि सर्जरीमुळे गेल्या ९ महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. मात्र आता तो फिट झाला आहे.

शमीने वनडे वर्ल्डकप २०२४ फायनलनंतर सामना खेळलेला नाही. यानंतर तो टाचेच्या दुखापतीमुळे बाहेर गेला होता. त्याची सर्जरीही झाली.

शमी दुखापतीमुळे आयपीएल आणि टी-२० वर्ल्डकपही खेळू शकला नाही. तो एनसीएमध्ये रिहॅबमध्ये आहे आणि नेट्समध्ये गोलंदाजी सुरू केली आहे. तो डोमेस्टिक क्रिकेटमधून पुनरागमन करेल.

शमी रणजी ट्रॉफीमध्ये खेळू शकोत. शमी आणि त्याचा छोटा भाऊ मोहम्मद कैफला बंगाल स्क्वॉडच्या संभाव्य ३१ प्लेयर्सच्या लिस्टमध्ये सामील केले गेले.

पीटीआयच्या माहितीनुसार शमी बंगालचे पहिले दोन सामने खेळू शकतो. हे सामने ११ ऑक्टोबरपासून उत्तर प्रदेश आणि १८ ऑक्टोबरपासून बिहारविरुद्ध होणार आहेत.

सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका सुरू होत आहे. यात शमी खेळणे अशक्य दिसत आहे. मात्र ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो खेळू शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -