Friday, May 23, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Paris Paralympics 2024: भव्यदिव्य सोहळ्यासह पॅरिस पॅराऑलिम्पिकची सुरूवात, सुमित-भाग्यश्री भारताचे ध्वजवाहक

Paris Paralympics 2024: भव्यदिव्य सोहळ्यासह पॅरिस पॅराऑलिम्पिकची सुरूवात, सुमित-भाग्यश्री भारताचे ध्वजवाहक

पॅरिस:ऑलिम्पिकनंतर आता पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी सज्ज झाला आहे. याची सुरूवात बुधवारी २८ ऑगस्टला फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका भव्य ओपनिंग सेरेमनीसह झाली. ओपनिंग सेरेमनी प्लस डेला कॉनकर्ड आणि चॅप्स एलिसीससारख्या प्रतिष्ठित स्थानी झाली.


यावेळेस पॅराऑलिम्पिक गेम्स २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत रंगणार आहेत. पॅरिस पॅराऑलिम्पिक २०२४मध्ये ओपनिंग सेरेमनीसाठी सुमित अंतिल आणि भाग्यश्री यादव यांना ध्वजवाहक म्हणून निवडण्यात आले होते. दोघांनी तिरंगा झडकावत एंट्री केली आणि त्यांच्यासोबत संपूर्ण भारतीय संघ आला.


पॅरिस पॅराऑलिम्पिक ११ दिवस सुरू राहणार आहे. साधारणपणे पॅराऑलिम्पिक स्टेडियमच्या आत असते. मात्र पारंपारसक समारंभाशिवाय या वेळेस पॅराऑलिम्पिकचे उद्धाटन सोहळा ओपनमध्ये पडला. यात शहरातील काही प्रसिद्ध स्थळांचा समावेश आहे जसे आयफेल टॉवर, प्लेस डेला, कॉनकॉर्ड आणि ट्रोकाडेरो आहे.



टोकियोमध्ये भारताच्या खात्यात ५ सुवर्णसह १९ पदके


भारताकडून पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये ८४ खेळाडूंचे आतापर्यंतंचे सर्वात मोठे दल पाठवण्यात आले आहे. सर्व खेळाडू १२ खेळांमध्ये भाग घेणार आहेत. २०२१मध्ये झालेल्या टोकियो स्पर्धेत भारताच्या ५४ खेळाडूंनी ९ खेळांमध्ये भाग घेतला होता.

Comments
Add Comment