शाहिन शाह आफ्रिदीला दाखवला बाहेरचा रस्ता तर अबरार अहमदला मिळाली पुन्हा संधी
कराची : बांगलादेशविरुद्ध ३० सप्टेंबरपासून रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या (Pakistan vs Bangladesh) दुस-या कसोटीसाठी पाकिस्तानने १२ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
बांगलादेशचा क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. बांगलादेशने मालिकेतील पहिली कसोटी १० गडी राखून जिंकली. मालिकेतील दुसरी कसोटी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
🚨 Pakistan’s 12 for the second Test 🚨#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/9TprXzdzjx
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 29, 2024
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी पाकिस्तानने वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीला संघात स्थान देण्यात आलेले नाही. तर लेगस्पिनर अबरार अहमदला या सामन्यासाठी परत बोलावण्यात आले आहे.
पाकिस्तानचा संघ : शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), अबरार अहमद, मोहम्मद अली, सलमान अली आगा, सैम अयुब, बाबर आझम, मीर हमजा, मोहम्मद रिझवान, अब्दुल्ला शफीक, नसीम शाह, खुर्रम शहजाद