Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

Inflation: १०, २०, ३० वर्षानंतर काय असेल १ कोटींची किंमत?

Inflation: १०, २०, ३० वर्षानंतर काय असेल १ कोटींची किंमत?

मुंबई: आजकाल प्रत्येकाला करोडपती बनायचे आहे. यामुळे लोकांनीही शेअर मार्केट तसेच स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायला सुरूवात केली आहे. आजच्या काळात १ कोटी रूपये म्हणजे नक्कीच मोठी रक्कम आहे.

खासकरून रिटायरमेंटबाबत लोक विचार करतात की १ कोटीमुळे प्रत्येक लक्ष्य साधता येईल जसे घर खरेदी करणे, मुलांचे शिक्षण, अथवा त्यांच्या लग्नाचा खर्च इत्यादी. मात्र तुम्ही विचार केला आहे का की तुम्ही १०, २० अथवा ३० वर्षानंतर रिटायर व्हाल तेव्हा या १ कोटीची किंमत काय असेल.

महागाई वेळेसह पैशाची किंमत कमी करते. आज आपल्याला जी रक्कम मोठी वाटत आहे ती पुढे जाऊन तितकीच मोठी राहत नाही. गरजा पूर्ण करण्यासाठीही ही रक्कम पुरत नाही.

बचत कशी कमी करते महागाई?

आज तुमच्या खात्यात जर १ कोटी असतील तर ते तुम्हाला खूप वाटत असतील. मात्र तुमच्या भविष्यासाठीच्या खर्चांना ते तितके पुरेसे आहेत का? असे यासाठी कारण महागाईसोबत पैशांची किंमत कमी होत जाते.

जर आज एका कारची किंमत १० लाख रूपये आहे तर १५ वर्षानंतर याची किंमत जास्त असेल. विचार करा की १० अथवा १५ वर्षांपूर्वी तुम्ही किराणा सामान अथवा भाड्यासाठी किती रूपये खर्च करत होतात. तेव्हा ते खूप होते मात्र आता ती रक्कम तुम्हाला थोडी वाटू शकते.

१०, २०, ३० वर्षानंतर एक कोटीची किंमत

जर ६ टक्के महागाई दर मानला जर १० वर्षानंतर १ कोटी रूपयांची किंमत ५५.८४ लाख रूपये असेल. जर २० वर्षानंतर ६ टक्के महागाई दर मानला तर १ कोटी रूपयांची किंमत घटून ती ३१.१८ लाख रूपये होईल. तर ३० वर्षांनी १ कोटी रूपयाची किंमत आजच्या हिशेबाने १७.४१ लाख रूपये असेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >