Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीHoroscope: १५ नोव्हेंबरनंतर या राशींचे बदलणार नशीब, होणार मालामाल

Horoscope: १५ नोव्हेंबरनंतर या राशींचे बदलणार नशीब, होणार मालामाल

मुंबई: न्यायाचे देवता शनी देव महाराज लवकरच मार्गी होत आहेत. शनी सगळ्यात धीम्या गतीने चालणारा ग्रह आहे. शनी यावेळेस आपली राशी कुंभमध्ये विराजमान आहे. शनी कुंभ राशीत वक्री चाल चालत आहेत.

शनी वक्री अवस्थेत ३० जून २०२४ पासून आहे. वक्री अवस्था याचा अर्थ उलटी चाल. शनीची वक्री आणि शनीची मार्गी चाल खूप महत्त्वाची मानली जाते. शनी ही वक्री चाल १३५ दिवसांसाठी आहे. शनी १५ नोव्हेंबरला मार्गी होत आहेत. शनीचे मार्गी होणेही महत्त्वाचे असते.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी १५ नोव्हेंबरनंतर शुभ काळाची सुरूवात होत आहे. या दरम्यान कर्क राशीच्या आर्थिक समस्या संपतील. पैशांची चणचण दूर होईल. तुमच्या आयुष्यात दीर्घकाळ सुरू असणाऱ्या समस्या संपतील.

वृश्चिक रास

शनी मार्गी झाल्यानंतर वृश्चिक राशींचा काळ बदलणार आहे. त्यांच्या आर्थिक, मानसिक समस्या संपतील. तसेच ते आपल्या आयुष्यात ग्रोथ करण्यात अग्रेसर राहतील. शनी देवाच्या कृपेने सगळी कामे होतील. जर तुम्ही प्रॉपर्टीमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात तर तुमची इच्छा पूर्ण होईल.

मकर रास

मकर राशीवर सध्या शनीच्या साडेसातीचा प्रभाव सुरू आहे. मात्र १५ नोव्हेंबरनंतर शनी देवाची कृपा मकर राशीवर असणार आहे. शनी अवस्थेदरम्यान तुम्हाला अनेक त्रास सहन करावे लागले होते. मात्र हे सगळे त्रास संपणार आहेत.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी १५ नोव्हेंबरनंतर समस्या संपून जातील. आई-वडिलांचा सपोर्ट मिळेल. जी मुले शिक्षण घेत आहेत त्यांच्या समस्यांचे निराकरण होईल. इनकममध्ये वाढ होईल.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी १५ नोव्हेंबरनंतरचा काळ शुभ आहे. तुम्हाला कामात लोकांचा सपोर्ट मिळेल. स्थान परिवर्तन होऊ शकते. नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ज्या नोकरीसाठी दीर्घकाळ प्रयत्न करत होतात तिथे तुमचा भाग्योदय होईल. बिझनेसमध्ये धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -