Friday, May 9, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीला करा असा मराठमोळा लूक, फक्त 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीला करा असा मराठमोळा लूक, फक्त 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2024) या सणाची भाविक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. हा सण सर्वजण मोठ्या थाटामाटात साजरा करतात.



गणेश चतुर्थी हा उत्सव सर्वाधिक महाराष्ट्रात दिसून येतो. यंदा गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर रोजी येत असल्याने नागरिकांनी बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे.



आपल्या महाराष्ट्रात बाप्पाचं स्वागत पारंपारिक वेशभूषेने केले जाते. बाप्पा येण्याच्या काही दिवस आधीपासूनच महिला वेशभूषेची जय्यत तयारी करायला सुरुवात करतात. या गणेश चतुर्थीला तुम्हालासुद्धा पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशभूषा करायची असेल तर काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आज तुम्हाला आम्ही महाराष्ट्रीयन लूक कॅरी करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत, जेणेकरून तुमचा लूक अगदी मराठ्मोळाचं दिसेल.




नऊवारी साडी -


गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रीयन लूकमध्ये अतिशय सुंदर आणि गोजिरवाणं दिसायचं असेल तर आधी नऊवारी साडी नेसा. नऊवारी साडी हा एक पारंपारिक साडीचा सुंदर प्रकार आहे आणि महाराष्ट्रीयन लूकसाठी सर्वात महत्वाचा आहे. ही साडी इतर साड्यांपेक्षा लांब आहे आणि ती नेसण्याची शैलीही वेगळी आहे.




सोन्याचे दागिने -


बहुतेक स्त्रिया महाराष्ट्रीयन लूकमध्ये सोन्याचे दागिने घालतात. जर तुमच्याकडे सोन्याचे दागिने नसतील तर तुम्ही गोल्ड प्लेटेड ज्वेलरी देखील निवडू शकता. आता बाजारात गोल्ड प्लेटेड दागिने बरेच उपलब्ध असतात. तुमच्या कानातल्यापासून नेकपीसपर्यंत सर्व काही सोन्याचे असावे.




पारंपारिक नथ -


नऊवारी साडीवर जर ठसठशीत उठून दिसणारी नाथ नसेल तर शोभाच येत नाही त्यामुळे पारंपरिक नथीचा महाराष्ट्रीयन लूक पूर्ण करण्यात महत्त्वाचा वाटा आहे. याशिवाय तुमचा महाराष्ट्रीयन मेकअप अपूर्ण दिसेल. अशा वेळी तयारी करताना चुकूनही विसरू नका.




चंद्रकोर टिकली -


कपाळावर चंद्रकोर टिकली ही मराठी महिलांची शान आहे. अशा वेळी जर तुम्ही महाराष्ट्रीयन लूक कॅरी करत असाल तर कपाळावर सामान्य टिकली लावण्याऐवजी चंद्रकोर टिकली लावा. चंद्रकोर तुमच्या लूकला चारचांद लावेल, दिसायलाही सुंदर दिसेल आणि यामुळे तुमचा लूक पूर्ण दिसेल.




गजरा किंवा गजऱ्याचा आंबाडा -


तुमचा महाराष्ट्रीयन लुक पूर्ण करण्यासाठी तुमच्या केसांमध्ये तुम्हाला पाहिजे तसा अंबाडा बनवा. नऊवारी साडीसोबत मोकळे केस चांगले दिसत नाही. नऊवारी नेसल्यास केसांमध्ये अंबाडा बनवून त्यावर गजरा लावा. किंवा खरा गाजर लावलात तरी सुंदर दिसते. यामुळे तुमचे सौंदर्य वाढेल.




गणेश चतुर्थीला जर तुम्हाला महाराष्ट्रीयन लूकमध्ये एकदम भारी दिसायचंय तर, वरील गोष्टी नक्की लक्षात ठेवा. फोटो येतील अतिशय सुंदर..!









Comments
Add Comment