नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) दोन आठवड्यांपूर्वी भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले होते. ४.८ तीव्र भूकंपाच्या या धक्क्यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नव्हती. त्यानंतर आज पुन्हा अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १ वाजून २६ मिनिटांच्या सुमारास अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.७ इतकी मोजण्यात आली. या भूकंपाचा प्रभाव राजधानी दिल्ली आणि आजुबाजुच्या परिसरातही जाणवला. अद्यापही या भूकंपामध्ये कुठल्याही जीवित किंवा वित्तहानीची नोंद झालेली नाही. मात्र या भूकंपामुळे सध्या भीतीचे वातावरण पसरले गेले आहे.