मुंबई : मुंबईसह (Mumbai News) राज्याच्या कानाकोपऱ्यातील रूग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारे जे.जे. रुग्णालय (JJ Hospital) सर्व रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी नेहमीच कार्यरत असते. सातत्याने जेजे रुग्णालयाबाबत नवीन अपडेट्स समोर येत असताना एक आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय (Government Hospital) असलेल्या जे.जे.रुग्णालयामध्ये रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा सुरु करण्यात आली आहे. या सुविधेमध्ये प्रगत प्रतिजैविक ऍक्रेलिक पेंटचा वापर करण्यात आला आहे. काल या अत्याधुनिक ‘अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षा’चे (Antimicrobiol Emergency Room) आज उद्घाटन करण्यात आले असून या तंत्रज्ञानामुळे काही तासांत ९९.९९ टक्के विषाणूंवर नियंत्रण (Controlling viruses) मिळवणे सोपे होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायल येथील डीप-टेक कंपनी नॅनोसोनोने निर्लाटच्या सहकार्याने विकसित केली आहे. प्रगत प्रतिजैविक ऍक्रेलिक पेंटचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. इस्रायलच्या आरोग्यसेवा प्रणालीमध्ये यश मिळालेले हे तंत्रज्ञान मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्य दूतावास, सेंट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून भारतात आणले गेले. यात समाविष्ट केलेले क्वाएक्टीव्ह, हे तंत्रज्ञान पेंट जोपर्यंत भिंतींवर राहतो तोपर्यत हानिकारक सूक्ष्मजीवांपासून संरक्षण मिळणार आहे. तसेच हे पेंट आणि तंत्रज्ञान संक्रमण नियंत्रणासह पर्यावरणास अनुकूल तसेच सुरक्षित आहे.
वैद्यकीय सुविधांमध्ये बदल घडवून आणणारी झेप
इस्रायल आणि भारतामध्ये आरोग्य क्षेत्रातील देवाण-घेवाणसाठी होत असलेले सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. वैद्यकीय क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. दोन्ही राष्ट्रांमधील सहयोग यामुळे आणखी वृधीगत होईल. वैद्यकीय सुविधामध्ये बदल घडवून आणणारी ही झेप आहे, असे इस्रायलचे मुंबईतील कॉन्सुल जनरल कोबी शोशानी यांनी म्हटले.