भक्ताला दत्तात्रय रूपात दर्शन

Share

समर्थ कृपा- विलास खानोलकर

श्री स्वामी समर्थ महाराज हे कोणत्या देवतेचे रूप आहे, याची चर्चा तेव्हा अक्कलकोटात रंगत असे. प्रत्येक उपासकाला आपली उपास्य देवताच समोरच्या प्रत्येक देवतेमध्ये, साधुपुरुषांत पाहण्याची सहज सवय असते. गाणगापूरला जाणारे दत्तोपासक अक्कलकोटमार्गेच वास करणारे असल्याने इथे बहुतेकदा थांबत व श्रीनृसिंहस्वामी दत्तमहाराज हे श्रीस्वामी महाराजांच्या प्रकटकाळात आपल्या भक्तांना अक्कलकोटातच पाठवत असत. त्यामुळे बऱ्याच भक्तांना श्री स्वामीमहाराजांना दत्तावतार म्हणण्याची पद्धत पडून गेली. नानासाहेबांनाही हे कळल्यामुळे त्यांचे दत्तस्वरूप खरे का व असल्यास तसे रूप व्हावे, अशी तळमळ त्यांना लागली.

यातील सत्यत्व हेच की, समोर आलेल्या उपासकाच्या इच्छेस अनुसरून श्री स्वामीमहाराज हे स्वतः ज्या मूल रूपात आहेत. त्या रूपाहून वेगळे असेच दर्शन घडविणार. जसे बहुरूपी स्वतःचे रूप सोडून अन्य रूपे धारण करतो, ज्याप्रमाणे नटवर्य स्वतःचे रूप वगळता अन्य भूमिका साकारतो. तसेच महाराजांचे होय. महाराज हे परब्रह्मरूप. त्यांसमोर अन्य कोणताही अवतार या त्यांच्या क्षणैक लीला. त्याप्रमाणे नानासाहेबांच्या डोक्यात श्रीदत्तरूपाच्या अानुषंगाने विचार सुरू असताना महाराज म्हणाले, ‘नाना, चल माझ्याबरोबर.’ एका दूर अशा डोंगर पायथ्याशी पश्चिमेच्या दिशेने त्यांनी नानांना नेले. तिथे महाराज एका शिळेवर उभे राहिले. नानासाहेब चकित होऊन पाहतात तो काय! तिथे महाराजांच्या जागी श्री दत्तात्रेय भगवान दृश्यमान झाले होते.

स्वामीच दत्तात्रय रुपात
स्वामी माझे महाकृपाळू

स्वामी माझे महादयाळू ।। १।।
जेथे जेथे जे जे कमीतेथे उभे राहती स्वामी ।। २।।
प्रकटदिनी हजर स्वामी

देवळा देवळात स्वामी ।। ३।।
घरा घरात स्वामी
मना मनात स्वामी ।। ४।।

काश्मीर ते कन्याकुमारीस्वामी फिरती जगभर ।। ५।।
गिरगाव ते गोरेगाव
अक्कलकोट ते गुरगाव ।। ६।।
प्रत्येक प्रसन्न गाव

स्वामीचे गुण गाव।। ७।।
डोंबिवलीचे झाले कल्याण
उल्हासनगरचे स्वामींमुळे कल्याण ।। ८ ।।
हिमालय नेपाळात पोचले स्वामी

अमेरिकेतही प्रकटले स्वामी ।।९।।
स्वामी प्रकट दिनी
स्वामींची प्रचिती सातासमुद्रगामी ।। १०।।
आली आली स्वामींची पालखी

आली हो दत्ताची पालखी ।। ११।।
स्वामी माझा श्रीकृष्ण सखा
स्वामींचा मी सुदामा सखा ।।१२।।
स्वामी नाम घ्या मंजुळ

वाटा गोड तीळगुळ।।१३।।
स्वामी दर्शनाची हो आवडी
वाढवा स्वामी नामाची गोडी ।।१४।।
गरीब श्रीमंत भक्त कोणी

सर्व भक्तांनी साधावी पर्वणी ।।१५।।
स्वामीचे ईश्वरी दर्शन
साक्षात दत्तप्रभूचे दर्शन ।।१६।।
ब्रह्मा विष्णू महेश देती हो दर्शन

सर्व संकटाचे होई विसर्जन ।। १७।।
फुले फळे गुलाल अर्चन
राहू केतूचे होई मर्दन।।१८।।
साक्षात दत्तअवधुताचे दर्शन

घ्या विश्वरूप स्वामींचे दर्शन ।।१९।।
मिळेल शतवर्षे आयुष्य
स्वामीच उचलतील
इंद्रधनुष्य ।। २०।।

vilaskhanolkarkardo@gmail.com

Recent Posts

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…

31 minutes ago

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…

40 minutes ago

Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…

48 minutes ago

प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…

1 hour ago

Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…

2 hours ago

संग्राम थोपटे २२ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश करणार, काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…

2 hours ago