मुंबई: एअरटेलकडे अनेक प्रीपेड रिचार्ज प्लान्स आहेत जे विविध फायदे आणि वेगवेगळ्या किंमतीसह येतात. आज आम्ही तुम्हाला अशा स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत.
येथे एअरटेलच्या अशा प्लानबद्दल सांगत आहोत जे वार्षिक रिचार्ज प्लान आहे. यात युजर्सला दर महिन्याला रिचार्ज करण्याची गरज नाही.
येथे एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लान १९९९ रूपयांचा आहे. या प्लानमध्ये कॉलिंग, डेटा आणि बरंच काही मिळेल.
एअरटेलचा हा प्लान ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. अशातच हा प्लान संपूर्ण एक वर्षांसाठी आहे.
एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. ही कॉलिंग लोकल आणि एसटिडी कॉलला सपोर्ट करते.
एअरटेलच्या या रिचार्जमध्ये युजर्सला २४ जीबी इंटरनेट डेटा मिळतो. हा डेटा काही जणांना कमी वाटत असेल. हा प्लान त्या लोकांसाठी आहे ज्यांना केवळ कॉलिंगची जास्त गरज असते.
एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्सला १००एसएमएस वापरायला मिळतील. एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, टीव्ही शोज आणि बरंच काही पाहायला मिळेल. यासाठी Airtel Xstream App डाऊनलोड करावे लागेल.