मुंबई:रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी नेहमीच नवे नवे प्लान सादर करत असते. ग्राहक आपल्या हिशेबाने रिचार्ज प्लान सिलेक्ट करू शकतात आणि फायदा मिळवू शकात. आता कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये दोन नवे प्लान आले आहेत. आपण ज्या प्लानबद्दल बोलत आहोत ते १२९९ रूपये आणि १७९९ रूपयांचे आहेत. या दोन्ही प्लानमध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.
जिओच्याया १२९९ रूपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला दर दिवशी २ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये ग्राहक अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा फायदा मिळवू शकतो. सोबतच यात दर दिवसाला १०० एसएमएसचा फायदा मिळतो. नव्या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड ५जी डेटा दिला जातो. या प्लानची व्हॅलिडिटी ८४ दिवस म्हणजेच साधारण ३ महिन्याची आहे.
या प्लानची खास बाब म्हणजे या १२९९ रूपयांच्या जिओ प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्स मोबाईल पॅकचा अॅक्सेस दिला जातो. जर तुम्ही नेटफ्लिक्सचा प्लान वेगळा घेत असाल तर नेटफ्लिक्स मोबाईल पॅक एक महिन्यासाठी १४९ रूपये द्यावे लागतात. मोबाईल प्लानमध्ये युजर्स नेटफ्लिक्सवर 480p (SD) रेजोलूशनमध्ये व्हिडिओज पाहिले जाऊ शकतात.
१७९९ रूपयांच्या प्लान
रिलायन्स जिओच्या दुसऱ्या प्लान १७९९ बद्दल बोलायचे झाल्यास यात ग्राहकांना दर दिवशी ३ जीबी डेटा दिला जातो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते. या प्लानमध्ये दर दिवशी १०० एसएमएसचाही फायदा मिळेल.