३१० क्रमांकाची बससेवा अनिश्चित; प्रवासी संतप्त
- तेजल नेने – मोरजकर
मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकावर ३१० बससेवेससाठी प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. १० मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना ४० ते ५० मिनिटांचा वेळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर होत असलेल्या वाहतूक कोंडीप्रमाणेच आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सुद्धा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणारा हा शीव रेल्वे पूल पाडून नवा उभारण्यात येणार आहे. हा पूल बंद झाल्याने मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट झाली आहे. मुंबईतील ११२ वर्षे जूना ब्रिटिशकालीन पूलचा शेवटचा दिवस, चार भागांना जोडणार पूल बंद झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शीव स्थानकातील ११२ वर्षे जूना ब्रिटिशकालीन पूल १ ऑगस्टपासून बंद करण्यात आला. हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे.आणि त्यासाठी ५० कोटी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे साधारण २ वर्ष या पुलाचे काम पूर्ण होण्याचे सांगितले जात आहे.
सद्य स्थितीला बघितले तर कुर्ला ते धारावी ही सेवा विस्कळीत झाली आहे. वाहतुक कोंडी झाल्याने प्रवाशांना मिळणारी ३१० क्रमांकांची बस सेवा देखील कोलमडली आहे. आणि परिणामत: प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सायन पूल बंद झाल्याने मुंबईच्या बीकेसी दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. सायन रेल्वे पुलावरुन सुमारे १.५ लाख वाहने जा-ये करित असतात. कुर्ला स्टेशन ते वांद्रे स्टेशन पुर्व दरम्यान ३१० क्रमांकाची बससेवा आहे. परंतु बससेवेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना तब्बल ३० ते ४० मिनिटे वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच या प्रवासात जवळपास ३ ते ४ वेळा सिग्नल्स असल्याने देखील प्रवासी वैतागले आहेत. परिणामी नोकरदार वर्ग हे कार्यालयात उशिराने पोहोचत आहेत.
प्रवाशांची मागणी
३१० क्रमांकाची प्रवाशांना ने आण करणाऱ्या बसेसची संख्या वाढवण्याची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर डबलडेकेर एसी बससेवा ही डायमंड, टेलीफोन एक्सचेंजपर्यंतच चालवण्यात येते ती वाढवावी. जेणेकरुन प्रवाशांना त्याचा फायदा होईल. अनेक प्रवासी हे एसी बससेवेने प्रवास करतील परिणामी ३१० बससेवेमध्ये गर्दी कमी होईल.
प्रवाशांच्या बसस्टॉप बाहेर रांगा
३१० बससेवेसाठी प्रवासी संख्या वाढत आहे. रांगेत उभे राहणारे प्रवासी हे जवळपास अर्धा तास तरी ३१० क्रमांकाच्या बसची रोज वाट पाहत असतात. बहुतांशी प्रवासी हे बसस्टॉपच्या बाहेर उभे असतात. त्यामुळे रांगेत उभे राहणाऱ्या प्रवाशांमध्ये वादावादीचे प्रसंग निर्माण होतात.