Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीRe-Released Movie : सिनेप्रेमींना मनोरंजनाची पर्वणी मिळणार; पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित होणार 'हे'...

Re-Released Movie : सिनेप्रेमींना मनोरंजनाची पर्वणी मिळणार; पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित होणार ‘हे’ ब्लॉकबस्टर चित्रपट!

एकेकाळी बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालणारे काही चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बॉलीवूडमधील (Bollywood) अनेक चित्रपट सिनेमागृहात पुन्हा प्रदर्शित (Re-Released) झाले आहेत. हम आपके है कौन, लैला मजनू, राजा बाबू, रॉकस्टार असे काही वर्षांपूर्वी गाजलेले चित्रपट चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित करण्यात आले होते. या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरघोस प्रेम दिले. त्यानंतर आता आणखी चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. जाणून घ्या कोणते आहेत ते चित्रपट.

तुंबाड – री-रिलीज होणाऱ्या चित्रपटांमधील यादीत पहिले हॉरर चित्रपट ‘तुंबाड’चे नाव आहे. हा चित्रपट ६ वर्षानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ३० ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

रहना है तेरे दिल में – आर माधवन आणि दिया मिर्झा यांचा कल्ट क्लासिक चित्रपट ‘रहना है तेरे दिल में’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

गँग्स ऑफ वासेपूर – री-रिलीजच्या यादीत अनुराग कश्यपचा कल्ट चित्रपट गँग्स ऑफ वासेपूरचाही समावेश आहे. या चित्रपटाच्या री-रिलीजची घोषणा अनुराग कश्यपने सोशल मीडियावर केली आहे.

दंगल – आमिर खानचा चित्रपट दंगल देखील या री-रिलीजच्या यादीत आहे. फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, अपारशक्ती खुराना आदींच्या भूमिका आहे. कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुलींवर चित्रपटाची कथा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -