Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीMamata Banerjee : सॉरी." ..."; कोलकाता निर्भया प्रकरणावर ममता बॅनर्जींनी मागितली माफी

Mamata Banerjee : सॉरी.” …”; कोलकाता निर्भया प्रकरणावर ममता बॅनर्जींनी मागितली माफी

कोलकाता : कोलकाता येथील ट्रेनी डॉक्टर बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. देशभरात या घटनेच्या विरोधात निदर्शनं होत आहेत. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही डॉक्टरच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. ९ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज (R G Kar medical College and Hospital) आणि हॉस्पिटलमध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, “मी तृणमूल छात्र परिषदेचा स्थापना दिवस हा पीडितेला समर्पित करत आहे. आम्ही तुमच्यासमोर संवेदना व्यक्त करतो आणि जलद न्याय मिळण्याची आशा करतो. अमानवी घटनांना बळी पडलेल्या सर्व वयोगटातील महिलांसोबत आमची सहानुभूती आहे, सॉरी.” पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे जोर दिला की विद्यार्थी आणि तरुणांची सामाजिक भूमिका मोठी आहे.

पुढे ममता बॅनर्जी म्हणाल्या, “समाज आणि संस्कृती जागृत ठेवत नवीन दिवसाची स्वप्नं दाखवणं आणि नव्या दिवसाच्या उज्ज्वल संकल्पाने सर्वांना प्रेरित करणं हे विद्यार्थी समाजाचं काम आहे. मी आज सर्वांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन करते. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, निरोगी राहा आणि उज्ज्वल भविष्यासाठी वचनबद्ध राहा.” याच दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपाने शांततापूर्ण आंदोलनावर १२ तासांच्या ‘बंगाल बंद’ची हाक दिली आहे.

कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेलेला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या प्रदर्शनाला ‘नबन्ना अभियान’ असं नाव देण्यात आलेलं आहे. बंगालमध्ये आज तणाव पाहायला मिळत आहे. भाजपाने आज १२ तासांच्या बंगाल बंदची हाक दिली आहे. भाजपा बंददरम्यान नादियामध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -