Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीमालवण घटनेचे कल्याण कनेक्शन; जयदीप आपटे आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षिततेच्या भीतीने घर...

मालवण घटनेचे कल्याण कनेक्शन; जयदीप आपटे आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षिततेच्या भीतीने घर सोडून पसार!

कल्याणमधील शिल्पकार चर्चेत

कल्याण : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पुतळा बनवणारे कल्याणमधील कलाकार जयदीप आपटे आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षिततेच्या भीतीने घर सोडून इतरत्र स्थलांतरित झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाला भीती वाटत आहे की या घटनेमुळे कोणी त्यांच्यावर हल्ला करेल.

मिळालेल्या माहितीनुसार, आपटे हे पत्नी आणि आईसोबत कल्याणमधील बाजारपेठ परिसरात राहतात. बाजारपेठ दुधनाका परिसरात आपटे राहत असलेल्या इमारतील सदनिकेत सद्य स्थितीत तेथे कोणीही नव्हते आणि शेजाऱ्यांनीही काहीही बोलण्यास नकार दिला.

आपटे २०१९ मध्ये चर्चेत आले जेव्हा आपटे यांच्या माध्यमातून यूके स्थित शीख सैनिक संघटनेने ब्रिटीश सैन्यासोबत दोन्ही महायुद्धात लढलेल्या शीख सैनिकांच्या सन्मानार्थ यॉर्कशायरमध्ये बनवलेल्या शीख सैनिकाचा कांस्य पुतळा आपटे यांनी त्यांच्या २५०चौरस फुटांच्या कार्यशाळेत ६.५ फुटांचा पुतळा तयार केला होता. ब्रिटीश आर्मी, रॉयल ब्रिटिश लीजन आणि किर्कलीस कौन्सिल यांच्या सहकार्याने संस्थेने वेस्ट यॉर्कशायर येथे एका विशेष समारंभात पुतळ्याचे अनावरण केले होते.

आपटे यांनी कलाविश्वात त्यांचा प्रवास जेजे स्कूलमध्ये सुरू केला, जिथे त्यांनी शिल्पकला आणि मॉडेलिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी कल्याणमध्ये स्वतःची कार्यशाळा उघडली, जिथे त्यांनी यापूर्वी महात्मा गांधींचे पुत्र मणिलाल गांधी यांचा गुजरातमधील दांडी स्मारकासाठी पुतळा तयार केला आहे.

आपटे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. त्यांच्या एका मित्राने नाव न सांगण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते म्हणाले, “मला माझ्या मित्र मंडळातून कळले आहे की जयदीपकडून ही चूक कशी झाली आणि कोणी केली हे फक्त तोच सांगू शकतो, पण तो स्वतःहून चूक करणार नाही हे मला माहीत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -