शिमला : हिमाचल प्रदेशातील सुक्खू सरकारने मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सुक्खू सरकारने मान्सून सत्राच्या आधी मुलींच्या लग्नाचे वय कमीत कमी २१ वर्षे करण्याबाबतचे विधेयक सादर केले. मंगळवारी सदनाच्या कामकाजादरम्यान बिनविरोध हे विधेयक संमत करण्यात आले. दरम्यान, आता हे विधेयक राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश विभानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सत्राची सुरूवात मंगळवारी झाली. या दरम्यान हिमाचल प्रदेश बाल विवाह प्रतिषेध विधेयक २०२४मध्ये सदनात सादर केल्यानंतर मंजूर करण्यात आले सुबे यांच्या आरोग्य, सामाजिक न्याय तसेच अधिकार मंत्री धनीराम शांडिल यांनी हे विधेयक पटलावर ठेवेल. यावर कोणतीही चर्चा झाली नाही आणि बिनविरोध हे विधेयक संमत करण्यात आले.
आधी होते १८ वर्षे वय
हिमाचल प्रदेशात आतापर्यंत मुलींच्या लग्नाचे वय १८ वर्षे होते. मात्र राज्य सरकारने ही वयोमर्यादा वाढवून २१ वर्षे केली आहे. याआधी सुक्खू कॅबिनेटने ७ महिन्यांआधी संशोधित ड्राफ्टला मंजुरी दिली होती आणि आता सदनामध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले.